alia bhatt's bodyguards pen emotional notes for newlyweds sakal
मनोरंजन

आलियाचा बॉडीगार्ड म्हणतो, तुझ्या इवल्याशा हातांना धरण्यापासून ते तुला नवरी..

रणबीर आणि आलिया यांचा नुकताच विवाह झाला. या लग्नाचे फोटो सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत. यामध्ये आलियाच्या बॉडीगार्डने तिच्यासाठी लिहिलेली पोस्ट विशेष चर्चेत आहे.

नीलेश अडसूळ

Ranbir Alia Wedding : बॉलीवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर (ranbir kapoor) आणि बॉलीवूडची चुलबुली गर्ल आलिया भट्ट (alia bhatt ) यांच्या लग्नाच्या चर्चा गेले अनेक दिवस बी टाऊनमध्ये रंगल्या होत्या. अखेर आता दोघे एकमेकांचे जीवनसाथी झाले आहेत. १४ एप्रिल रोजी रणबीरच्या पाली हिल येथील वास्तू या निवासस्थानी दोघांनीही लग्नगाठ बांधली. आलिया आणि रणबीरमध्ये गेले अनेक वर्षांची मैत्री होती. २०१५ पासून ते एकमेकांना डेट करत आहेत. पण दोघांनीही आपल्या नात्याची कबुली दिली न्हवती. मात्र सोनम कपूरच्या लग्नात दोघेही उघडपणे मीडियासमोर आले. आणि तेव्हापासून यांच्या रेलशनशिपच्या चर्चा बी टाऊनमध्ये सुरु झाल्या. आणि अखेर हे दोघे सप्तपदी घेऊन एकमेकांचे जीवनसाथी बनले.

सध्या या लग्नाचे फोटो सर्वत्र व्हायरल होत आहे. बॉलीवूड मधील अनेक कलाकारांनाही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यात सर्वात प्रेमळ शुभेच्छा तिच्या बॉडीगार्डने दिल्या आहेत. या शुभेच्छांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. आलियाच्या लहानपणापासून ते आत्तापर्यंत तिचा बॉडीगार्ड म्हणून काम करणाऱ्या सुनिल तळेकर यांनी तिच्यासोबतचा लग्नातला खास फोटो शेयर करत एक भावनिक पोस्ट केली आहे. (alia bhatt's bodyguards pen emotional notes for newlyweds)

सुनिल तळेकर फार पूर्वीपासून भट कुटुंबाकडे अंगरक्षक म्हणून कार्यरत आहेत. आलियाच्या लग्नानंतर तळेकर यांनी इन्स्टाग्रामवर रणबीर-आलियासोबत लग्नातला फोटो शेयर केला आहे. या फोटोला त्यांनी 'From holding your tiny hands to seeing you as a bride I can say my heart is filled with happiness today' असे कॅप्शन दिले आहे. म्हणजे 'तुझ्या इवल्याशा हातांना धरण्यापासून ते तुला नवरीच्या रुपात पाहण्यापर्यंतचा प्रवास पाहताना माझं हृदय आनंदाने भरुन गेलं आहे,' असे ते म्हणतात. या पोस्टला आलियाने लाईकही केलं आहे.

सुनिल यांनी काही दिवसांपूर्वी सोनी राजदान आणि आलियाचा फार जुना फोटो शेयर केला होता. यात चिमुकली आलिया फारच गोड दिसतेय. तेव्हापासून सुनिल हे त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेची काळजी घेतायत. या निमित्ताने एका अंगरक्षकाला भट कुटुंबीयांनी दिलेले प्रेम आणि अंगरक्षकाला आलिया विषयी वाटणारे ममत्व दिसून येते. या फोटोला चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! पगारावरील शिक्षकांनाही द्यावी लागणार ‘टीईटी’; सुप्रिम कोर्टाच्या निकालावर राज्य सरकार गप्पच; महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद घेणार २३ नोव्हेंबरला ‘टीईटी’

आजचे राशिभविष्य - 13 सप्टेंबर 2025

Weekend Breakfast Idea: वीकेंडला सकाळी नाश्त्यात झटपट बनवा दुधीभोपळ्याचे सँडविच, सोपी आहे रेसिपी

Nagpur Accident: खापा मार्गावर आयशरने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Beed Crime: पत्नीच्या मारहाणीत पतीचा मृत्यू; गुन्हा दाखल, कौटुंबिक वादातून अंबाजोगाई शहरातील घटना

SCROLL FOR NEXT