Amber Heard claims Johnny Depp sexually assaulted her with alcohol bottle, threatened to carve her face Google
मनोरंजन

हॉलीवूड अभिनेत्यावर पत्नीचा खळबळजनक आरोप; म्हणाली,'तो माझ्या गुप्तांगात...'

हॉलीवूड अभिनेता जॉनी डेपची पूर्वाश्रमीची पत्नी अंबर हर्डनं कोर्टात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

प्रणाली मोरे

हॉलीवूडचा(Hollywood) प्रसिद्ध अभिनेता जॉनी डेपवर(Johny Depp) पूर्वाश्रमीची पत्नी अंबर हर्डनं(Ambar Heard) खळबळजनक आरोप केल्यानं सगळेच शॉक झाले आहेत. अंबर हर्डनं जॉनी डेपवर जबरदस्ती 'ओरल सेक्स' केल्याचा आरोप केला आहे. कोर्टात सुनावणीच्या दरम्यान अंबर हर्डकडून साक्षीदार म्हणून उभे राहिलेल्या सायकॉलॉजिस्ट डॉ.डॉन व्ह्यूनं हा दावा केला आहे की जॉनी डेपनं ज्या पद्धतीनं अंबरवर मानसिक-शारिरीक अत्याचार केले त्यामुळे तिची अवस्था खूप वाईट झाली होती.

त्या सायकॉलॉजिस्टनं दावा केलाय की,जॉनी डेप जबरदस्ती ओरल सेक्स करायचा. अगदी एकदा तर त्यानं अंबरच्या गुप्तांगात जबरदस्ती दारूची बाटली घातली होती. तुमच्या माहितीसाठी इथं नमूद करतो की याआधी जॉनी डेप कडून साक्षीदार म्हणून उभ्या केलेल्या सायकॉलॉजिस्टनं अंबर हर्डचे आरोप खोटे आहेत असं म्हटलं आहे. तसंच अंबर हर्ड पोस्ट ट्रॉमेटिक स्ट्रेस डिसऑर्डरशी झुंजत असल्याचा खोटा दावा करीत आहे असंही जॉनी डेपच्या साक्षीदारानं म्हटलं होतं.

अंबर हर्डनं कोर्टात साक्षीदार म्हणून उभ्या केलेल्या सायकॉलॉजिस्ट डॉ.डॉन हयूने जे दावे केले त्याचं समर्थन करताना अनेक गोष्टींचे दाखले दिले. दारुच्या नशेत जॉनी डेप अंबरला खूप वाईट वागणूक द्यायचा. कितीतरी वेळा जॉनी डेपनं यासाठी अंबरची माफी देखील मागितली होती. डॉ.डॉन ह्यूने सांगितलं की दोघांच्या भांडणात कधीतरी अंबरनंही जॉ़नीला धक्के दिले आहेत. तसंच खूप वाईटही बोलली होती. पण तोंडानं बोलणं,भांडणं आणि मारणं,शारिरीक अत्याचार करणं यात मोठा फरक आहे जे डेपनं अंबरसोबत केलं आहे.

डॉ.डॉन ह्यूनं कोर्टात हे देखील सांगितलं की जॉनी डेपच्या वाईट वर्तणुकीमागे तो अंबरवर जळत होता हे मुख्य कारण आहे. अंबर हर्डला सिनेमात न्यूड सीन्स करायला त्याची मनाई होती. अंबर कुठल्या सिनेमात काम करत असेल तर डेप त्या सिनेमाच्या क्रु मेंबरला किंवा दिग्दर्शकाला तिच्यावर नजर ठेवण्यास सांगायचा. डेपनं अंबर हर्डवर अभिनेता बिली बॉब थॉर्टंन आणि जेम्स फैंकोसोबत अफेअर असल्याचा आरोपही केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamuna Expressway Accident: मध्यरात्री धुक्यात अचानक आगीचा भडका… क्षणात पेटल्या ८ बस-कार; प्रवासी जीवंत जळाले... रात्रीचा थरारक क्षण

Solapur Crime:'विद्यार्थिनींवर अत्याचार करणारा शिक्षक बडतर्फ'; वर्गात सीसीटीव्ही कॅमेरा, जन्मठेपेची शिक्षा अन्..

राज्य सरकारचा माेठा निर्णय! 'गुन्हा लपविल्यास मुख्याध्यापकासह व्यवस्थापनाविरुद्धही गुन्हा'; जबाबदारी केली निश्‍चित..

मोठी बातमी! कमी पटाच्या झेडपी शाळांवर कंत्राटी शिक्षक; ७० वर्षांपर्यंतच्या सेवानिवृत्त शिक्षकांची २० हजार रुपयांच्या मानधनावर होईल नेमणूक

Pune News : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करून पुण्याला वाहतूक कोंडीतून मुक्त करण्याचा उपक्रम; शहराच्या सर्वांगीण विकासावर फडणवीसांचा जोर!

SCROLL FOR NEXT