Amitabh Bachchan, Elon Musk, Amitabh Bachchan news, elon musk removed blue tick amitabh bachchan  SAKAL
मनोरंजन

Amitabh Bachchan Tweet: शहंशाह खुश हुआ..! ‘तू चीज़ बड़ी है musk’,ट्विटरवर ब्लु टिक मिळताच अमिताभ इलॉनवर खुश

Vaishali Patil

अलीकडेच, ट्विटर या मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरवरून अनेक सेलिब्रिटींच्या अधिकृत खात्यांवरून ट्विटर ब्लू टिक काढून टाकण्यात आले आहे, त्यानंतर इलॉन मस्कच्या या अचानक निर्णयामुळे सर्वत्रच गोंधळ उडाला.

आता या यादित या यादीत अमिताभ बच्चन, शाहरुख खान, रजनीकांत, सलमान खान यांसारख्या अनेक बॉलिवूड स्टार्सच्या नावांचाही समावेश आहे. त्याच वेळी, आता अमिताभ यांनी त्यांच्या पोस्टमध्ये आणि तेही एका मजेदार 'अलाहाबादी' शैलीत त्यांचे ब्लू टिक परत मागितले होते.

ट्विटरवरून ब्लू टिक गायब झाल्यापासून अमिताभ बच्चन सतत ट्विट करत आहेत. आता अमिताभ बच्चन यांना त्यांची ब्लू टिक परत मिळाली आहे. त्यामुळे आता ते जरा जास्तच खुश आहे. यासंदर्भात अमिताभ बच्चन यांनी अनेक मजेशीर ट्विट केले आहेत.

ट्विटरवरून ब्लू टिक गायब होताच अमिताभ बच्चन यांनी एकापाठोपाठ एक अनेक ट्विट केले. जरी त्याला निळी टिक परत मिळाला आहे. या आनंदात बिग बींनी इलॉन मस्कचे आभार मानले इतकच नाही तर त्याच्यासाठी एक गाणेही गायले आहे.

अमिताभ बच्चन यांनी मजेशीर ट्विट केले आणि म्हटले की, 'हे मस्क भावा मी तुझे खुप खुप आभार मानतो. माझ्या नावापुढे ती ब्लू टिक पुन्हा आली. आता काय सांगू भावा.. माझं गाणं गाण्याचं मन होत आहे. ऐकशील का? हे घे ऐक.."तू चीज़ बड़ी है musk musk ... तू चीज़ बड़ी है, musk "'

त्याच्या या मजेशीर ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या तितक्यातच त्यांनी आणखी एक ट्विट केलं ज्यात त्यांनी ट्विटला काकू बनवलं. त्यानंतर ते पुन्हा वेगळ्या अडचणीत आले.

तेव्हा त्यांनी त्यांच्या ट्विट मध्ये लिहिलं की, 'हे घ्या आणखी एक प्रॉब्लेम झाला... सर्व विचारत आहे. ट्विटर ला तु भाऊ म्हणत आहे. आता मावशी कशी काय झाली. तर मी तुम्हाला समजावून सांगतो की याआधी ट्विटर ची निशाणी हा एक कूत्रा होता. त्यामुळे त्याला भाऊ म्हटलं. त्यांनतर ते चिन्ह पुन्हा चिमणी झालं त्यामुळे ती मावशी आहे. '

अशा प्रकारे अनेक मनोरंजक ट्विट अमिताभ यांनी केले आहे. सोशल मीडिया यूजर्सच्या या पोस्टवर भरभरून प्रतिक्रिया येत आहेत. अमिताभची ही रंजक शैली अनेकांना आवडली आहे. याआधी अमिताभ बच्चन यांनी इलॉन मस्क यांच्याकडे ट्विटरमध्ये सुधारणा करण्याची मागणी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Slab Proposal: कररचनेत ऐतिहासिक बदल! आता जीएसटीत फक्त दोनच दर, केंद्राचा प्रस्ताव मंजूर

Explainer: 'गाझा'वर ताबा मिळवण्यासाठी इस्रायल तयार; पण २० वर्षांपूर्वी सैनिकांना माघारी बोलावण्याची आली होती वेळ

Vajrasana Benefits: जेवल्यावर लगेच करता येणारे एकमेव आसन! जाणून घ्या वज्रासनाचे जबरदस्त फायदे

Charging Port Repair Tips : मोबाइल चार्ज होत नाही? घरच्या घरी 'या' सोप्या ट्रिकने दुरुस्त करा पोर्ट, बघा एका क्लिकवर

Trump Tariff: ट्रम्प टॅरिफचा फटका अमेरिकेलाच बसला! 446 कंपन्या दिवाळखोर; बेरोजगारीही वाढली

SCROLL FOR NEXT