amruta fadnavis on devendra fadanvis first reaction on new song mood bana liya trolling urfi javed issue  
मनोरंजन

Amruta Fadnavis : गाणं ऐकल्यावर देवेंद्रजींचा मूड कसा होता? अमृता फडणवीसांचं उत्तर, 'त्यांना तर…'

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. अमृता फडणवीस यांचं नुकत्याच रिलीज झालेल्या 'मूड बना लिया' या गाण्याला चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे. तर काही जण ट्रोल देखील करत आहेत.

दरम्यान अमृता फडणवीस यांनी मी भजन केलं तरी ट्रोल होते, ट्रोल होण्याची सवय झाली मला, त्याने मला फरक पडत नाही अशा शब्दात ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे.

त्यांच्या गाण्याबद्दल बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, मला खूप आनंद होतोय. लोकांना गाणं आवडलं, स्वीकारलं त्याचे रिल्स होत आहेत. माझा विश्वास आहे. कोणीही काही बोलले तरी काम करत राहिले असे म्हणाल्या आहेत.

हेही वाचा - प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

गाण्याबद्दल देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

अमृता फडणवीस यांनी यावेल देवेंद्र फडणवीस यांना गाणं कसं वाटलं याबद्दलही माहिती दिली आहे. देवेंद्र गाणं चांगलं आहे असं म्हणाले अशी माहिती त्यांनी माध्यमांना दिली . तसेच मला पंजाबी गाणं आवडलं म्हणून ते गाणं केलं असल्याचेही अमृता फडणवीस म्हणाल्या.

ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्यावरून त्यांना सोशल मीडियात ट्रोल केलं जात आहे. या ट्रोलर्सना उत्तर देताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, मी भजन केलं तरी ट्रोल होते, ट्रोल होण्याची सवय झाली मला, त्याने मला फरक पडत नाही. लोकांनी सपोर्ट केला त्यामुळे मी काम करते असेही त्यांनी सांगितले. प्रत्येक विषयावर लोकांचे विचार असतात,तुम्ही जे आहात ते तुम्ही आहात,दबून नका जाऊ,पण भान बाळगा, पण कुठे कस वागायचं हे याच भान ठेवा असेही त्यांनी सुनावलं.

उर्फी बद्दल काय म्हणाल्या..

राज्यात सध्या गाजत असलेल्या उर्फी प्रकरणावर अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितलं की, कॉमन ठिकाणी जाताना संस्कृती जपली पाहिजे, तुमचं व्यवसायिक आयुष्य आणि सार्वजनिक आयुष्य वेगळं असत. महिलाच महिलांना आता मागे ओढतात,गहाण बोलणं थांबवलं पाहीजे असेही त्यांनी म्हटलं.

राज्यातील सरकारवर बोलताना सरकार चांगलं सुरळीत चालू आहे,त्या दोघांना अनुभव आहे त्यामुळे चांगले निर्णय घेतले जात आहेत. मंत्रिमंडळात कोण नाही कोण आहे त्यांना चांगलं माहिती आहे लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करतील असेही त्यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

Tata Tiago 2026 : पेट्रोल-CNG-EV एकत्रच लाँच; टाटाची सर्वात स्वस्त कार, सेफ्टी फिचर्सही वाढवली

"प्रयोग गेले, चित्रपट गेला आणि मी तोंडावर पडले" लक्ष्मीनिवास फेम अभिनेत्रीने सांगितला तिला आलेला विचित्र अनुभव

माकडामुळे गावात ६ दिवस लॉकडाऊनसारखी स्थिती, हल्ल्यात ७० जण जखमी; ५ ते ७ जण गंभीर

Panvel Flood Risk: पनवेलला पुराचा धोका? विमानतळासाठी भराव, बदललेल्या नदीपात्रामुळे संकट ओढावण्याची भीती

SCROLL FOR NEXT