Anil Kapoor Charge double fees to make his hair white in movie
Anil Kapoor Charge double fees to make his hair white in movie Instagram
मनोरंजन

Anil Kapoor: केस पांढरे हवे असतील तर दुप्पट फी द्यावी लागेल, अनिल कपूर यांची अट

प्रणाली मोरे

Anil Kapoor:बॉलीवूडचा एव्हरग्रीन अभिनेता म्हणून अनिल कपूर यांना ओळखलं जातं. अनिल कपूर त्यांच्या अभिनयासोबतच फिटनेससाठी देखील लोकप्रिय आहेत. वयाच्या 65 व्या वर्षी देखील अनिल कपूर यांचा अभिनय आणि उत्साह तरुणांना लाजवेल असाच आहे. अनिल यांनी नुकताच हिंदुस्तान टाइम्सच्या एका समिटमध्ये सहभाग घेतला होता.

यावेळी त्यांनी हॉलीवूड सुपरस्टार्स जॉर्ज क्लूनी यांच्यासोबत मनमोकळा संवाद साधला. या संवादात त्यांनी बॉलीवूड आणि बॉलीवूड मधील त्यांच्या प्रवासामधील अनेक खास गोष्टी शेअर केल्या.

एखाद्या सिनेमासाठी जर दिग्दर्शकाला अनिल कपूर यांचे केस पांढरे हवे असतील तर या खास लूकसाठी आपण दुप्पट फी आकारतो तर काळ्या केसांमधील लूकसाठी नॉर्मल फी आकारतो असं सांगत अनिल कपूर यांनी एक खास किस्सा शेअर केला.

जॉर्ज क्यूनीसोबतच्या संवादादरम्यान अनिल कपूर यांनी 'दिल धडकने दो' या सिनेमा वेळीचा तो खास किस्सा शेअर केला. कपूर यांना या सिनेमांमध्ये एका वयस्क बिझनेसमनची भूमिका साकारायची आहे याची कल्पना दिग्दर्शक जोया अख्तर यांनी दिली. या सिनेमासाठी अनिल कपूर यांना जॉर्ज क्लूनी सारखा लूक ठेवायचा आहे असं जोया यांनी सांगितलं. जॉर्ज क्लूनी सारख्या या लूकसाठी त्यांना जवळपास 100 तास मेकअप रूममधील खुर्चीवर बसून राहावं लागलं होतं असं अनिल कपूर यांनी सांगितलं. तर सर्व अवॉर्ड्स घेण्यासाठी देखील अनिल कपूर यांनी हाच लूक कायम ठेवला होता असंही त्यांनी सांगितलं.

'दिल धडकने दो' या सिनेमाच्या रिलीजनंतर त्यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या लूकची देखील मोठी चर्चा झाली होती. या घटनेपासून जर माझ्याकडून कोणी जॉर्ज क्लूनी सारख्या लूकची डिमांड केली तर मी लगेचच फी दुप्पट करतो असं ते म्हणाले. त्यांचा हा किस्सा ऐकून हॉलीवूड अभिनेते जॉर्ज क्लूनी मनसोक्त हसले. अनिल कपूर यांचा सध्याचा लूक त्यांचा आगामी सिनेमा 'फाइटर' साठी असल्याचं त्यांनी सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT