Ankush Chaudhari In 4 blind Men, thriller marathi movie. Google
मनोरंजन

4 अंध व्यक्ती आणि 1 हत्ती; 'दगडी चाळ २' नंतर अंकुशच्या '4 ब्लाइंड मेन' ची चर्चा

मराठीतील हा थ्रिलर सिनेमा बॉलीवूडमधील अमिताभ बच्चन यांच्या 'आंखे' सिनेमावर आधारित असल्याचं बोललं जात आहे.

प्रणाली मोरे

Ankush Chaudhari: जिओ स्टुडिओज नुकत्याच तीन वेगवेगळ्या चित्रपटांची घोषणा केल्यानंतर आता आणखी एका थ्रिलर चित्रपटाची घोषणा करीत आहे. चित्रपटाचे नाव '४ ब्लाइंड मेन' (4 Blind Men) असे आहे. हा चित्रपट ४ अंध व्यक्ती आणि हत्ती यांवर आधारित प्रसिद्ध बोधकथेवर चित्रित केला आहे. या चित्रपटात ४ वेगवेगळ्या वळणावरती असणाऱ्या या अंधव्यक्ती काही असामान्य परिस्थितीत सापडल्या असून नशीब त्यांना एकत्र घेऊन येते . एकामागोमाग एक अशा घडलेल्या खूनांमुळे त्यांच संपूर्ण आयुष्य कायमच बदलून जाते. प्रेक्षकांना हा थ्रिलर चित्रपट खुर्चीवर खिळवून ठेवणारा आहे.(Ankush Chaudhari In 4 blind Men, thriller marathi movie.)

नितीन वैद्य निर्मित आणि अभिषेक मेरुकर दिग्दर्शित या चित्रपटात अंकुश चौधरी मुख्य भूमिकेत झळकत असून सोबतच शुभंकर तावडे, संकर्षण कऱ्हाडे, शेखर दाते व मृण्मयी देशपांडे या दिग्गज कलाकारांची फौज झळकत आहे.

दिग्दर्शक अभिषेक मेरूकर चित्रपटाबद्दल सांगतात, " जेव्हा मला या चित्रपटावर काम करण्याची संधी मिळाली, त्यावेळी मला मराठी चित्रपटसृष्टीतील जबरदस्त कलाकारांची फौज हवी होती, जे कलाकार चित्रपटातील पात्रांची भूमिका योग्य प्रकारे पार पाडतील, असे कलाकार मला भेटले.

मराठी चित्रपसृष्टीत पहिल्यांदाच थ्रिलर हा चित्रपटाचा प्रकार अनुभवला जात आहे. सर्वच कलाकारांनी आपआपल्या भूमिकेला चांगलाच न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहिल्यानंतरच्या त्यांच्या प्रतिक्रियेची मला उत्सुकता लागलेली आहे ."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT