Asha Bhosle brought up her kids single mother sing to earn mony,leave 1 month old son alone at home for work
Asha Bhosle brought up her kids single mother sing to earn mony,leave 1 month old son alone at home for work  Google
मनोरंजन

घर चालवणं कठीण झालं तेव्हा मनावर दगड ठेवून आशा भोसलेंनी घेतलेला मोठा निर्णय...

प्रणाली मोरे

Asha Bhosle: जगप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका आशा भोसले ८ सप्टेंबर,२०२२ रोजी ८९ वर्षांच्या झाल्या आहेत. १९४० मध्ये त्यांनी आपल्या गायकीच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि आज जगभरात त्यांचा चाहतावर्ग मोठ्या संख्येनं पहायला मिळतो. आजही त्यांच्या आवाजाची जादू कायम आहे. पण हिंदी फिल्म इंडस्ट्रीत आपलं स्थान निर्माण करण्यासाठी आशा ताईंना खूप कठीण प्रसंगातून जावं लागलं आहे. एवढंच नाही तर करिअर करतानाच त्यांना आपल्या मुलांचा सांभाळही एकटीनेच करावा लागला.(Asha Bhosle brought up her kids single mother sing to earn mony,leave 1 month old son alone at home for work)

आशा भोसले यांनी गणपतराव भोसले यांच्यासोबत लग्न केले होते. तेव्हा त्यांचे वय खूप कमी होते. लग्नानंतर त्यांना तीन मुलं झाली. आशा ताई एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या,त्यांचे पती गणपतराव फक्त १०० रुपये इतकी कमाई करायचे. त्यामुळे घर चालवण्यासाठी आशा भोसले यांना देखील सहकार्य करावं लागायचं. पण करिअर करण्यासोबतच त्या घर आणि मुलांची जबाबदारीही चोख सांभाळायच्या.

१९९३ मध्ये झालेल्या एका मुलाखतीत आशा भोसले म्हणाल्या होत्या की, जेव्हा त्यांनी गाण्यात आपलं करिअर सुरू केलं तेव्हा त्या मुंबईपासून खूप लांब रहायच्या. अशात त्यांना रोज लांबचा ट्रेनचा प्रवास करुन मुंबईत यावं लागायचं. १९४९ मध्ये त्यांचा मुलगा हेमंतचा जन्म झाला तेव्हा त्या आपल्या १ महिन्याच्या मुलाला घरी एकटं सोडून कामावर यायच्या,कारण त्यांना पैशाची खूप गरज होती. आशा भोसले असं देखील म्हणाल्या की रियाज करण्यासाठी त्या सकाळी ५ वाजता उठायच्या. एवढी मेहनत घेतल्यानंतर कधी गाण्यासाठी बोलावलं जायचं तर कधी अनेक दिवस कामाची वाट पाहावी लागायची.

बोरीवलीला आशा भोसले जेव्हा शिफ्ट झाल्या होत्या त्यावेळच्या काही गोष्टीही त्यांनी मुलाखतीत शेअर केल्या होत्या. त्या म्हणाल्या होत्या, तेव्हा बोरीवलीतील ती जागा एक गाव होतं. लोक तेव्हा आशा ताईंना गायिका म्हणून ओळखू लागले होते. पण त्यांच्या आयुष्यातील दगदग काही थांबली नव्हती. रोज त्या घराजवळच्या विहिरीतून पाणी भरायच्या,जेवण बनवायच्या,मुलांचे डब्बे वेगळे, त्यांना शाळेत सोडणं आणि सासरच्यांची काळजी हे सगळं त्या लक्ष ठेवून करायच्या. आणि हे सगळं केल्यानंतर तासन-तास उभं राहून गाण्याचं रेकॉर्डिंग करायच्या. यात कधी-कधी ८-८ तासही जायचे.

१९६० मध्ये आशा भोसले आपल्या पतीपासून विभक्त झाल्या आणि १९६६ मध्ये त्यांच्या पतीचं निधन झालं. त्यानंतर आशा ताईंनी एकटीनं मुलांचा सांभाळ केला. आशा ताई एकदा आपल्या मुलाखतीत म्हणाल्या होत्या की कॅब्रे सॉन्ग गाणारी सिंगर अशी त्यांची ओळख अनेकांना खटकायची. कितीतरी मोठ्या लोकांनी यावरनं त्यांना सुनवालं देखील होतं. पण आशा भोसलेंसमोर कोणतंही गाणं गाऊन मुलांना सांभाळायचं हा उद्देश होता, आणि त्यांना त्यामुळे गाणं सोडताही येणार नव्हतं.

आशा भोसले यांचे चिंरजीव हेमंत भोसले यांनी संगीतकार म्हणून काही वर्ष इंडस्ट्रीत काम केलं होतं. याविषयी एकदा आशा भोसले म्हणाल्या होत्या की, आपल्या मुलांनी म्युझिक इंडस्ट्रीत काम करावं असं त्यांना केव्हाच वाटलं नाही. कारण इथे कामाची शाश्वती नाही. इथे सगळं लक फॅक्टर आहे,नवीन कुणी आलं की जुन्यांना विसरणं इथली रीत आहे असं देखील त्या म्हणाल्या होत्या.

आशा भोसले यांचा मुलगा हेमंत भोसले यांचे २०१५ मध्ये कॅन्सरने निधन झाले. २०१२ मध्ये त्यांची मुलगी वर्षा यांनी राहत्या घरात आत्महत्या केली. त्यांचे छोटे चिरंजीव आनंद यांनी काही सिनेमांची निर्मिती केली आहे. आनंद देखील दुबईतील एका इस्पितळात काही शारिरीक व्याधींमुळे एप्रिल महिन्यात अॅडमिट होते. संकटं कितीही आली तरी त्यावर मात करत हसत-हसत आयुष्य जगणाऱ्या आशा ताई मात्र नेहमीच इतरांसाठी उत्साहाचा झरा राहिल्या आहेत. आज त्यांचा वाढदिवस आहे,सो शुभेच्छा द्यायला कसं बरं विसरु आपण...Happy Birthday Asha Bhosle Taai...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूला दुसरा धक्का! अर्धशतकानंतर डू प्लेसिस आऊट, पण विकेटमुळे झाला ड्रामा

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT