Tumhe Kitna Pyaar Karte  esakal
मनोरंजन

Tumhe Kitna Pyaar Karte : बॉलीवूडला नावं ठेवाल पण, अरिजीतला नाही! नव्या गाण्यानं चाहते भारावले

प्रसिद्ध अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री जान्हवी कपूर यांच्या बवाल चित्रपटातील अरिजितच्या आवाजातील गाणे आता प्रदर्शित झाले आहे.

युगंधर ताजणे

Bawaal song Tumhe Kitna Pyaar Karte Video Released: प्रसिद्ध अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री जान्हवी कपूर यांच्या बवाल चित्रपटातील अरिजितच्या आवाजातील गाणे आता प्रदर्शित झाले आहे. अवघ्या काही मिनिटांत या गाण्याला चाहत्यांकडून लाखो व्ह्युज मिळाल्याचे दिसून आले आहे.

बवालमधील पहिले गाणे तुम्हे कितना प्यार करत है हे आता चाहत्यांसमोर आले आहे. बवालच्या निमित्तानं पहिल्यांदाच एकत्र आलेल्या दोन्ही कलाकारांच्या अभिनयाचे नेटकऱ्यांनी कौतूक केले आहे. अशातच त्यावर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया देखील भलत्याच गंमतीशीर असल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी या गाण्याचा केवळ ऑडिओ प्रदर्शित करण्यात आला होता. हा चित्रपट २१ जुलै रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

Also Read - manipur violence : दोन महिन्यांपासून अशांत असलेलं मणिपूर हे नवं काश्मीर बनतंय का? या अशांतपर्वाचा घटनाक्रम जाणून घेऊया

खरं तर बवाल चित्रपटाच्या रिलिज डेटवरुन देखील वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या व्हायरल झाल्या. पहिल्यांदा हा चित्रपट ७ एप्रिल २०२३ मध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र त्यावेळी त्याची रिलिज डेट आणखी पुढे ढकलण्यात आली होती. आता हा चित्रपट ६ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय या चित्रपटाची ओटीटीवरील रिलिज डेट देखील बदलण्यात आली आहे.

जान्हवी-वरुणची केमिस्ट्री नेटकऱ्यांना भावली...

बवाल प्रदर्शित होण्यापूर्वीच वरुण आणि जान्हवीच्या केमिस्ट्रीच चर्चा रंगली होती. आता तुम्है कितना प्यार करत है हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्यावर नेटकऱ्यांच्या असंख्य प्रतिक्रिया आल्या आहेत. अरिजितच्या तरल आवाजातील ते गाणं चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून चाहते या गाण्याची वाट पाहत होते. या चित्रपटामध्ये वरुण धवन आणि जान्हवी पहिल्यांदाच एकत्रित स्क्रिन शेयर करणार आहेत.

वरुण आणि जान्हवी यांना अजूनही नव्या वर्षात म्हणावा असा सूर काही गवसलेला नाही. वरुणचा यापूर्वी भेडिया नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र त्याला प्रेक्षकांचा फारसा काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानं प्रेक्षकांची निराशा केल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर आता बवालबाबत प्रेक्षकांना आणि या दोन्ही सेलिब्रेटींच्या चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केलं असून त्यांनी पहिल्यांदा दंगल आणि छिछोरे सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते.

बवालची निर्मिती साजिद नाडियावालानं केली आहे. सोशल मीडियावर तर जान्हवी आणि वरुणच्या या नव्या चित्रपटाचे प्रेक्षक आनंदानं आणि उत्साहानं स्वागत करतील अशी आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात बवालचे काय होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara ZP Politics : साताऱ्यात झेडपी सभापती निवडीवर राष्ट्रवादी-शिवसेनेचा बहिष्कार; शंभूराज देसाई-मकरंद पाटलांचा 'मास्टरस्ट्रोक', पण भाजपचा मार्ग झाला मोकळा

नागपुरात हनुमान जयंतीच्या मिरवणुकीत १४ वर्षांचा मुलगा बेपत्ता; संतापलेल्या नागरिकांकडून रस्ताजाम, पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी

Nanded Gangwar: नांदेड गँगवारचा थरार... मध्यरात्री रक्तरंजित हल्ला; एका रात्रीत तीन जणांची निर्घृण हत्या, शहरात दहशत!

Dharashiv News: ३६ हजार ‘लाडकीं’ची ई-केवायसी; चुकीच्या माहितीमुळे रखडलेली प्रक्रिया मार्चअखेर पूर्ण

Shirol Kolhapur village dispute : कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यात एका झाडावरून दोन गावात वाद उफाळला, वडाच्या झाडावरून तणावपूर्ण स्थिती

SCROLL FOR NEXT