big boss seson 14 love bird Ejaz and pavitra puniya love story  
मनोरंजन

हिला तर बरोबर घेऊनच जाणार;बिग बॉस मधलं 'लव बर्ड'

सकाळ ऑनलाईन टीम


मुंबई -  बिग बॉस शो हा त्याच्यातील गॉसिपमुळे जास्त चर्चेत येत असतो. मात्र यंदाचा 14 वा सीझन हा मात्र या शो मधील प्रेमप्रकरणांमुळे फोकस झाला आहे. त्यात  सहभागी असणा-या वेगवेगळ्या स्पर्धकांनी यापूर्वी आपआपल्या गर्लफ्रेंडची नावे जाहिर केल्याने बिग बॉस सध्या लव बर्ड शो म्हणून प्रसिध्दीस येत आहे.

तसं पाहिलं गेल्यास बिग बॉसच्या प्रत्येक सीझनमध्ये एक वेगळ्या प्रकारची केमिस्ट्री पाहायला मिळते आहे. यंदाच्या सीझनमध्ये एजाज आणि पवित्रा यांच्या मैत्रीबद्दल सगळीकडे चर्चा आहे. सध्या हे दोघेही शो च्या दरम्यान एकमेकांना वेळ देत असल्याचे दिसून आले आहे. त्यांच्यात चांगले ट्य़ुनिंग जमल्याचे बोलले जात आहे.

एजाजला पवित्रा आवडत असल्याचे त्या दोघांच्या वागण्या बोलण्यावरुन दिसून आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यातील वाढता दुरावा हा कमी होत आहे. यापूर्वी फराहने त्यांच्यातील आपआपसांतील बेबनाव कमी केला होता. त्यांची समजूत घालून त्यांना एकत्र आणले होते. 

आता सध्या एजाज आणि पवित्रा हे यंदाच्या बिग बॉस 14 च्या सीझनचे लव बर्ड आहे. त्यांच्या बोलण्यात गोडवा आला आहे. ते दोघेही एकमेकांना समजून घेत आहे. ज्या चॅनेलवरुन ही मालिका सुरु आहे त्यात एजाज आणि पवित्रा पुनिया यांच्यातील जवळीक वाढत असल्याचे दिसून आले आहे.

नुकताच प्रदर्शित झालेल्या एका प्रोमोमध्ये एजाजने पवित्राला विचारले की, तु खरोखर अजूनही सिंगल आहेस का यावर पवित्राने मोठ्या प्रेमाने त्याला हो असं उत्तर दिलं. त्यावेळेपासून दोघांमधील केमिस्ट्री चर्चेत आली आहे.

 बिग बॉस मधील हे दोन्ही लव बर्ड एका बागेत वेळ घालवताना दिसत आहे. तसेत आपआपसांत गोडगोड गप्पा मारत आहे. त्यांच्या या व्हिडीओला चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटस मिळाल्या आहेत.गेल्या काही दिवसांपासून गायक  राहुल वैद्य आणि दिशा परमार यांच्याही अफेअर विषयी चर्चा रंगली होती. दिशा बरोबरच्या नात्याचा राहुलने सोशल मीडियावर खुलासा केला होता. त्यालाही मोठी प्रसिध्दी मिळाली होती. 

 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : विजय वडेट्टीवार आणि नाना पटोलेंनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

Kantara Chapter 1: ‘कांतारा-चॅप्टर १’ मध्ये दिलजीत दोसांझची एंट्री

Tokyo World Athletics 2025: जागतिक ॲथलेटिक्समध्ये तेजस शिरसेची उपांत्य फेरी थोडक्यात हुकली

Kolhapur Bhakt Niwas Scam : भक्त निवास म्हणून दाखवल्या शाळेच्या खोल्या, निधीचा गैरवापर; माहितीच्या अधिकारात धक्कादायक माहिती, मुख्य सूत्रधार कोण?

करदात्यांसाठी गूडन्यूज! ITR दाखल करण्यासाठी १ दिवस मुदतवाढ, मध्यरात्री निर्णय; आजच भरा

SCROLL FOR NEXT