Kanhaiya Lal Murder Case | Kangana Ranaut News
Kanhaiya Lal Murder Case | Kangana Ranaut News esakal
मनोरंजन

Kanhaiya lal murder: कन्हैयालाल हत्या प्रकरण, कंगनाचा संताप! 'देवाच्या नावानं...'

युगंधर ताजणे

Kangana Ranaut reaction on udiapur kanhaiya lal murder: राजस्थानातील उदयपूरमध्ये घडलेल्या घटनेचे देशभर पडसाद उमटल्याचे दिसून आले आहे. (bollywood actress) कन्हैयालालची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर वेगवेगळ्या स्तरातून त्यावर प्रतिक्रिया आल्या आहे. बॉलीवूडमधील धाकड गर्ल कंगनाच्या प्रतिक्रियेनं अनेकांचे त्या घटनेकडे लक्ष वेधले गेले आहे. तिनं सोशल (Bollywood News) मीडियावरुन संतप्त प्रतिक्रिया देत त्या घटनेची दखल घेतली आहे. जे काही होत आहे ते अतिशय गंभीर असून त्याविषयी तिनं चिंता व्यक्त केली (Social media viral news) आहे. कंगनाची ती प्रतिक्रिया सोशल मीडियावरुन व्हायरल झाली असून तिच्या चाहत्यांचा पोस्टला मोठा पाठींबा मिळाल्याचे दिसून आले आहे.(Kanhaiya Lal Murder Case)

कंगनानं लिहिलं आहे की, देवाच्या नावानं जे काही होतं आहे ते पाहिल्यास वाईट वाटते. त्या व्हिडिओनं मला हादरवून टाकलं आहे. तो व्हिडिओ पाहवत नाही. (Actress Kangana) देशभरामध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. ज्या व्यक्तीची हत्या झाली त्याचे दुकान जबरदस्तीनं बंद करण्यात आले. त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याची हत्या करण्यात आली. हे सारं मन विषण्णं करणारं आहे. असं कंगनानं म्हटलं आहे. तिच्या त्या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहे. बॉलीवूडच्या काही सेलिब्रेटींनी देखील पोलिसांकडे दोषींना शिक्षा करण्याची मागणी केली आहे. (Kangana Ranaut News)

उदयपूरच्या त्या घटनेनंतर अनेकांना मोठा धक्का बसला आहे. काही लोकं त्या व्यक्तीच्या दुकानात जाणीवपूर्वक घुसले. त्यानंतर मोठमोठ्या घोषणा देऊ लागले. हे सगळं काही देवाच्या नावानं सुरु आहे. जे कोणी असे काम करत असेल त्यांना तातडीनं शिक्षा करण्यात यावी. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावरुन व्हायरल झाल्या आहेत.

kangana post

कंगनानं आपल्यामध्ये तो व्हिडिओ पाहण्याचे धाडसच नाही. असे म्हटले आहे. तिनं तिच्या इंस्टावर स्टोरी शेयर करताना एकाचा फोटो शेयर केला आहे. कंगनाशिवाय अभिनेत्री स्वरा भास्कर, विशाल ददलानी, रिचा चढ्ढा यांनी त्या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT