Bollywood Actress Taapsee Pannu  esakal
मनोरंजन

Shabaash Mithu Trailer: 'असं खेळणार की कुणीही ओळख विसरणार नाही'!

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नु ही तिच्या (Bollywood Actress) वेगळेपणासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आहे.

युगंधर ताजणे

Shabaash Mithu movie : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नु ही तिच्या (Bollywood Actress) वेगळेपणासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आहे. यापूर्वी तिनं साकारलेल्या वेगवेगळ्या भूमिकांना प्रेक्षकांकड़ून मोठी दाद मिळाल्याचे दिसून आले आहे. सध्या तिच्या शाब्बास मिथु नावाच्या चित्रपटाची चर्चा आहे. (Bollywood News) त्याचा ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. त्यावर तापसीला (Taapsee pannu) नेटकऱ्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रियाही मिळाल्या आहे. भारतासाठी खेळण्याचं एका लहान मुलीनं स्वप्न पाहिलं आणि ते पूर्ण करुन दाखवलं.

मिताली राज या महिला खेळाडूला भारतीय महिला क्रिकेट संघाची सचिन (Sachin Tendulkar) तेंडुलकर असे म्हटले जाते. तिनं मोठ्या संघर्षाला सामोरं जावून भारतीय क्रिकेट विश्वात वेगळी ओळख निर्माण केली. केवळ भारतातच नाही तर जगभरातील महिला क्रिकेटमध्ये फलंदाजीमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रसिद्ध असणारी फलंदाज म्हणून मितालीचं नाव घ्यावं लागेल. बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री तापसी पन्नुनं शाब्बास मिथुमध्ये मिताली राजची भूमिका केली आहे. आज त्या चित्रपटाचा ट्रेलर व्हायरल झाला असून त्याला नेटकऱ्यांची मोठी दाद मिळाल्याचे दिसून आले आहे.

गेल्या वर्षी 83 नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र या चित्रपटानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. 1983 साली भारतीय क्रिकेट संघानं विश्वकरंडक जिंकून भारतीयांना मोठा आनंद दिला होता. तेव्हापासून भारतीय क्रिकेट संघाची वेगळ्या पद्धतीनं वाटचाल सुरु झाली. कालांतरानं महिला क्रिकेट संघानं देखील आपला वेगळा ठसा उमटविला. त्यामध्ये मिताली राजचे योगदान मोठे आहे. आता मिताली राजच्या आयुष्यावर चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

ट्रेलरमध्ये तापसीनं साकारलेली मिताली राज प्रभावित करणारी आहे. तिच्या तोंडी असलेले संवाद, तिची देहबोली लक्ष वेधून घेणारी आहे. त्यामुळे या चित्रपटाकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत. हा चित्रपट 15 जूलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT