Brahmastra 2, Deepika Padukone And Ranveer Singh esakal
मनोरंजन

Brahmastra 2 : दीपिका पदुकोण बनणार जलदेवी? मुख्य भूमिकेत रणवीर सिंग!

ब्रह्मास्त्र या चित्रपटाचा पुढील भागात कोण असणार?

सकाळ डिजिटल टीम

Brahmashtra 2 : आलिया भट आणि रणबीर कपूर यांची मुख्य भूमिका असलेला 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाची चाहते वाट पाहत आहेत. बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाबाबत वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. आता तो ९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

या चित्रपटाद्वारे रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट (Alia Bhatt) पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार असून या मोठ्या बजेट चित्रपटाला बॉलिवूडचे (Bollywood News) मार्व्हल युनिव्हर्स म्हटले जात आहे.

हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही आणि दरम्यान, त्याच्या पुढच्या भागाबाबत प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगू लागल्या आहेत. चित्रपटाचा पहिला भाग थिएटरमध्ये कसा गाजेल हे पाहणे रंजक ठरेल. दरम्यान, ब्रह्मास्त्र हा चित्रपट तीन भागांमध्ये बनवला जाणार आहे. दुसऱ्या भागात कोणते कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत?

व्हायरल वृत्तानुसार दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) यांना पुढील भागासाठी निर्माते विचार करित आहेत. बॉलीवूड लाइफच्या एका वृत्तानुसार, दीपिका पदुकोण ब्रह्मास्त्र दोनमध्ये जलदेवीची भूमिका साकारताना दिसणार आहे आणि काही लोकांनी ट्रेलरचा स्क्रीनशॉट शेअर करत म्हटले आहे की, पाण्यातून चालणारी मुलगी दीपिका आहे.

मात्र, रणवीर सिंग कोणत्या पात्राची भूमिका करणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण दीपिकाच्या व्यक्तिरेखेबद्दल जे अंदाज बांधले जात आहे ती ऐकणे खूपच रंजक आहे.

मात्र, चित्रपटाच्या भाग-दोन बाबत आत्तापर्यंत आलेल्या बातम्या केवळ अंदाज वर्तवलेला आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT