Chris Rock Jokes About Will Smith's Oscars Slap During Standup Set: 'Got Most of My Hearing Back' Google
मनोरंजन

Chris Rock ला स्टॅंडअप कॉमेडी करताना आठवलं 'थप्पड' प्रकरण; म्हणाला...

Oscar 2022 पुरस्कार सोहळ्यात पत्नीचा अपमान केल्यामुळं अभिनेता विल स्मिथनं कॉमेडियन ख्रिस रॉकला सर्वांसमक्ष कानाखाली वाजवली होती.

प्रणाली मोरे

कॉमेडियन ख्रिस रॉकला(Chris Rock) यंदाचा ऑस्कर पुरस्कार (Oscar Award 2022) सोहळ्यात हॉलीवूड(Hollywood) स्टार विल स्मिथनं(Will SMith) कानाखाली वाजवली अन् ही बातमी वाऱ्यासारखी जगभरात पसरली. अर्थात या 'थप्पड' प्रकरणामुळे विल स्मिथला ऑस्कर अकॅडमीनं शिक्षा सुनावली असली तरी अद्यापही हे प्रकरण राहून राहून काही ना काही कारणामुळे पुन्हा चर्चेत येत आहे. आता पुन्हा एकदा ख्रिस रॉकने यावर प्रतिक्रिया देऊन या प्रकरणाला चर्चेत आणलं आहे. लंडनमध्ये एका कॉमेडी शो दरम्यान ख्रिस रॉकने पुन्हा या घटनेवर भाष्य करताना म्हटलं आहे,''तुमच्यापैकी अनेकांना आश्चर्य वाटेल,पण मी आता ठीक आहे''.

ऑस्कर २०२२ च्या सोहळ्यात विल स्मिथनं ख्रिस रॉकच्या कानशिलात लगावल्याला भले आता खूप दिवस लोटले असतील तरीदेखील आज या घटने भोवती चर्चेचं वलय कायम आहे. या घटेनविषयी थोडक्यात सांगायचं झालं तर,यंदा ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन ख्रिस रॉक करीत होता. बोलता बोलता त्यानं विल स्मिथच्या पत्नीची तिच्या केसांवरुन खिल्ली उडवली. या कारणानं रागावलेल्या विल स्मिथने भर पुरस्कार सोहळ्यात मंचावर जाऊन सगळ्यांसमोर ख्रिस रॉकच्या कानाखाली मारली होती. याला आता दोन महिने उलटून गेले आहेत. त्यामुळे या धक्क्यातून आता ख्रिस रॉकही सावरलेला दिसतोय. तो स्वतः या घटनेवर विनोद करताना दिसत आहे.

गुरुवारी लंडन येथील रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये स्टॅंडअप कॉमेडी शो(Standup Commedy Show) दरम्यान त्यानं पुन्हा त्या 'थप्पड' घटनेचा उल्लेख केला. आपल्या नवीन 'इगो डेथ' या लाइव्ह कॉमेडी शो दरम्यान तो म्हणाला,''शब्द जितकी वेदना देत नाही जेवढं चेहऱ्यावर मार खाल्ल्यानं होते. पण आता मी ठीक आहे''.

रॉकने ही गोष्ट हलका-फुलका विनोद करत आपल्या स्टाईलमध्ये म्हटल्याचं कळत आहे. तो म्हणाला,''तुम्ही वाट पाहू नका की मी आता त्या निरर्थक गोष्टीवर बोलेन. तुम्ही काढलेलं तिकिट महाग आहे पण माझ्यासोबत जे घडंल तितकं नक्कीच नाही. हो पण, नक्कीच योग्य वेळ आली की मी बोलेनच''..

आता जर विल स्मिथविषयी बोलायचं झालं तर या 'थप्पड' प्रकरणानंतर शिक्षा म्हणून त्याच्यावर अकादमीनं अनेक निर्बंध घातले आहेत. तो खूप चर्चेतही आला. विल स्मिथच्या अनेक चाहत्यांनी त्यांनं पोस्ट केलेल्या माफीनाम्यावर प्रतिक्रिया दिल्या होत्या. विल स्मिथनं काही दिवसांपूर्वीच ऑस्कर अकादमीतील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पुढील दहा वर्ष त्याला ऑस्कर संबंधित कार्यक्रमात सहभागी होता येणार नाही. नुकताच त्यानं केलेला भारत दौराही चर्चेत आला होता. तसंच,ज्या पत्नीसाठी स्वतःला संकटात ओढलं तिनं देखील म्हणे त्याच्यापासून विभक्त होण्याचं ठरवलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray visits Meenatai Thackeray statue : उद्धव ठाकरेंनी केली मीनाताईंच्या पुतळ्याची बारकाईने पाहणी अन् म्हणाले ‘’या मागे दोनच व्यक्ती…’’

World Athletics Championships : नीरज चोप्राने एकाच प्रयत्नात केले सर्वांना गार, आता पाकिस्तानच्या अर्शद नदीमच्या कामगिरीकडे लक्ष

Uddhav Nimse : मुंबई हायकोर्टाकडूनही जामीन नाकारला: उद्धव निमसे अखेर पोलिसांपुढे शरण

Navratra and Overthinking Tips: मन गोंधळले असेल तर नवरात्रीचे ९ दिवस देतील नवा आधार! अशी करू शकता ओव्हरथिंकिंगवर मात

Jalaj Sharma : जिल्हाधिकारी जलज शर्मांची मोठी घोषणा: नाशिकमधील गड-किल्ले होणार स्वच्छ

SCROLL FOR NEXT