chris rock mother sakal
मनोरंजन

ख्रिस राॅकच्या आईची संतप्त प्रतिक्रिया.. म्हणाली, 'विल स्मिथला व्हायला हवी ही शिक्षा..'

ऑस्कर सोहळ्यातील कानाखाली प्रकरणावर ख्रिस राॅकच्या आई रोझ राॅक यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून विल स्मिथ बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

नीलेश अडसूळ

सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा ९४ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा २८ मार्च रोजी पार पडला. यावेळी अभिनेता विल स्मिथ याने सूत्रसंचालक ख्रिस रॉकच्या (chris rock) कानाखाली मारली. ख्रिस हा विनोदवीर असून त्याने सोहळा सुरु असताना विल स्मिथची पत्नी जेडाची खिल्ली उडवली होती. आपल्या पत्नीच्या आजारपणावर विनोद केल्याने विलने हे पाऊल उचलेले होते.

या प्रकरणावर सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. स्वत: विल स्मिथनेही ख्रिसची माफी मागितली होती. तर आस्कर पुरस्कार समितीनेही विलला १० वर्षांची बंदी घातली. मध्यंतरी एका कार्यक्रमात या कानाखालीचे योग्य वेळी योग्य उत्तर देईन असे ख्रिस म्हणाला होता. आता ख्रिसच्या आईनेही याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (oscars 2022)

ख्रिस रॉकची आई रोझ रॉक या प्रसिद्ध लेखिका आणि वक्त्या आहेत. नुकतंच एका कार्यक्रमात रोझ रॉक यांनी या संपूर्ण घटनेवर भाष्य केले. 'या घटनेनंतर माझा मुलगा व्यवस्थित वाटत असला तरीही तो अद्याप सावरलेला नाही. विलने जेव्हा ख्रिसच्या कानशिलात लगावली तेव्हा त्याने आम्हा सर्वांना कानशिलात लगावली किंबहुना माझ्या कानशिलात लगावली, असे मला वाटले. कारण माझ्या मुलाला दुखावले म्हणजे मलाही दुखावले.'

'मी यावर काय बोलू मला समजत नाही. विल तू हात उचलाना जगाचा विचार केला होतास का? तू जे कृत्य केलेस त्यामुळे खूप गोष्टींवर परिणाम झाला आहे. या घटनेनंतर कदाचित ख्रिस खचला असता. कदाचित तुला अटक होऊ शकली असती. पण तू याबद्दल जराही विचार केला नाही. तू केवळ तुझ्या पत्नीचा विचार केलास,' असे रोझ रॉक म्हणाल्या.

पुढे रोझ रॉक म्हणाल्या की, विलवर (will smith) १० वर्षांची बंदी घालण्यापेक्षा अकादमीने स्मिथचा ऑस्कर पुरस्कार परत घ्यायला हवा होता. (oscars 2022) केवळ स्मिथने सोशल मीडियावर माफीनामा जाहीर केला म्हणून त्यावर सौम्य कारवाई झाली. पण मला वाटत नाही की त्याने मनापासून माफी मागितली असावी. त्याने कधीही मनापासून माफी मागितली नाही याचे मला फार वाईट वाटते. फक्त चार ओळी लिहून 'क्रिस रॉक मी तुझी माफी मागतो' असे स्मिथ म्हणाला, पण त्यापेक्षा त्याने प्रत्यक्ष येऊन माफी मागायला हवी होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT