Deepika Padukonae expensive gift to ranbir kapoor. Google
मनोरंजन

एक्स गर्लफ्रेंड दीपिका पदूकोणचं रणबीरला लग्नात सगळ्यात महागड गिफ्ट

दीपिका पदूकोण सध्या शुटिंगमध्यै व्यस्त असल्यानं ती प्रत्यक्ष रीसेप्शन पार्टीला हजर राहिली नव्हती. मात्र तिनं पाठवलेल्या गिफ्टची चांगलीच चर्चा रंगली आहे.

प्रणाली मोरे

बॉलीवूडचा हॅंडसम हंक रणबीर कपूरनं(Ranbir Kapoor) अखेर बॉलीवूडची सगळ्यात क्यूट अभिनेत्री आलिया भट्ट(Alia Bhatt) हिच्याशी लग्नगाठ बांधली आहे. १४ एप्रिललला हा सेलिब्रिटी लग्नसोहळा रणबीरच्या मुंबईतील 'वास्तू' इमारतीतील घरी आप्तेष्ट-मित्रपरिवाराच्या उपस्थितीत पार पडला. या लग्नालाही बॉलीवूडच्या काही खास सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. लग्नात करिश्मा कपूर,अयान मुखर्जी,करण जोहर,करिना कपूर यांनी धमाल केलेली आपण फोटो-व्हिडीओच्या माध्यमातून पाहिली असेलच. लग्नाचं रीसेप्शनही रणबीरच्या घरीच काही खास गेस्टसाठी आयोजित केलं होतं. या पार्टीचीही चांगलीच चर्चा बी-टाऊन मध्ये रंगलेली दिसून आली. पार्टीतील मिस्टर अॅन्ड मिसेस कपूर च्या लूकला देखील चाहत्यांनी चांगलंच पसंत केलं आहे. आता रणबीर-आलियाला लग्नात आलेल्या गिफ्ट्सचीही चर्चा होताना दिसून येत आहे.

सगळ्यांनीच रणबीर-आलियाला लग्नाचं खास गिफ्ट दिलं आहे. पण यात सगळ्यात चर्चेत असेल तर ते आहे दीपिकाचं गिफ्ट. जे स्पेशल तर आहेच पण खूप किमती असल्याचं देखील बोललं जात आहे. चला जाणून घेऊया दीपिकानं नेमकं असं कोणतं गिफ्ट दिलं आहे त्याविषयी. बॉलीवूड लाइफच्या रीपोर्टनुसार रणबीर कपूरला काही वर्ष डेट केलेल्या दीपिका पदूकोण ने त्याला सर्वात महागडं गिफ्ट दिलं आहे म्हणे. बोललं जात आहे की दीपिकानं रणबीरला जवळ-जवळ १५ लाखाचं घड्याळ गिफ्ट म्हणून दिलं आहे. तर तिच्या नवऱ्यानं म्हणजे अभिनेता रणवीर सिंगनं एक बाइक रणबीरला गिफ्ट म्हणून दिली आहे. तर कतरीना कैफनं रणबीरला १४.५ लाखाचं एक सुंदर प्लॅटिनमचं ब्रेसलेट दिलं आहे.

लग्नात रणबीर-आलियाला दिलेल्या गिफ्टविषयीच बोलायचं झालं तर रणबीरची बहिण अभिनेत्री करिना कपूरनं आलियाला ३.१ लाख रुपयाचा डायमंड सेट दिला आहे. तर रणबीरसोबत अनेक सिनेमातनं काम केलेल्या अनुष्का शर्मानं आलियाला मनिष मल्होत्रानं डिझाईन केलेला एक सुंदर ड्रेस दिला आहे. या ड्रेसची किंमत आहे १.६ लाख रुपये. रणबीर-आलियाला गिफ्ट देणाऱ्यांची लिस्ट भलीमोठी आहे. या लिस्टमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा,वरुण धवन,प्रियंका चोप्रा अशा अनेकांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaiwalच्या गळ्याभोवतीचा फास आवळला, महिला व्यावसायिकलाही धमकावलं| Pune police | Sakal News

मुंबईच्या सागरी प्रवासात मोठा बदल होणार! लवकरच हाय-टेक कॅंडेला बोटी समुद्रात उतरणार, कशी आहे रचना?

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी 'आयएनएस विक्रांत'वर जवानांसोबत साजरी केली दिवाळी; म्हणाले- माझ्यासाठी भाग्याचा क्षण

World Osteoporosis Day 2025: चाळीशीतच हाडे ठिसूळ होण्याचा धोका, महिलांमध्ये ऑस्टिओपोरोसिसची वाढती समस्या; जाणून घ्या कारणे अन् उपाय

भावा...! Adam Zampa च्या नावाने आर अश्विनला मॅसेज; माजी फिरकीपटूने घेतली मजा, मोहम्मद शमीलाही तोच मॅसेज अन्...

SCROLL FOR NEXT