Dhirendra Shashtri Bageshwar Dham Jaya Kishori comment esakal
मनोरंजन

The Kerala Story : 'हिंदूंना...' धीरेंद्र शास्त्रीं 'केरळ स्टोरी'वर बोललेच, जया किशोरींनीही आळवला सूर!

आता बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री आणि जया किशोरी यांनी देखील द केरळ स्टोरीवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Dhirendra Shashtri Bageshwar Dham Jaya Kishori comment : कुणी काही का म्हणेना पण गेल्या काही दिवसांपासून द केरळ स्टोरीनं मोठ्या प्रमाणात वेगळीच वातावरण निर्मिती केली आहे.या चित्रपटाला प्रोपंगडा म्हणणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. अशातच वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी देखील या चित्रपटावर दिलेल्या प्रतिक्रिया चर्चेत आल्या आहेत.

आता बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री आणि जया किशोरी यांनी देखील द केरळ स्टोरीवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहे. यापूर्वी बागेश्वर धाम यांनी संत तुकाराम, साईबाबा यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. जया किशोरी या देखील त्यांच्या परखड वक्तव्यामुळे ओळखल्या जातात. केरळ स्टोरीवर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया त्यांचे भक्त आणि नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय आहे.

Also Read - Silicon Bank दिवाळखोरीः भारतावर नाही होणार दीर्घकालिन परिणाम...का ते वाचा!

सुदीप्तो सेन दिग्दर्शित द केरळ स्टोरी हा चित्रपट गेल्या दोन आठवड्यांपासून प्रचंड चर्चेचा आहे. या चित्रपटाची सोशल मीडियावर झालेली प्रसिद्धी आणि चर्चा यामुळे त्यानं शंभर कोटींचा टप्पा केव्हाच पार केला आहे. दुसरीकडे या चित्रपटावर मोठ्या प्रमाणात टीकाही होताना दिसते आहे. दिग्दर्शक आणि निर्माते यांनी केरळमध्ये जे घडते आहे तेच प्रेक्षकांपुढे मांडण्याचा विचार होता. असे सांगत हा चित्रपट प्रत्येकांनं पाहावा असे आवाहनही केले आहे.

अवघ्या ३० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली आहे. यासगळ्या धीरेंद्र शास्त्री यांनी दिलेली प्रतिक्रिया हा अनेकांच्या चर्चेचा विषय आहे. त्यांनी म्हटले आहे की, जे खरं आहे तेच चित्रपटातून मांडण्यात आले आहे. देशामध्ये जागरुकता आणण्यासाठी अशा प्रकारच्या चित्रपटांची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. काहींना हा चित्रपट खटकला आहे. मात्र माझे त्यांना सांगणे आहे की, देशाला अशा प्रकारच्या चित्रपटांची आवश्यकता आहे.

दुसऱ्या धर्मावर विश्वास ठेवण्यापूर्वी विचार करण्याची गरज आहे. केरळ स्टोरीमध्ये जे काही होते आहे ते आपल्या आसपास होते आहे. असे बागेश्वर धाम यांनी म्हटले आहे. दुसरीकडे जया किशोरी यांची प्रतिक्रियाही चर्चेत आली आहे. त्या म्हणाल्या, नेहमीच अशा प्रकारचे चित्रपट आले आहेत पण आपण त्या गोष्टीकडे कसे पाहतो हे देखील जास्त महत्वाचे आहे. चित्रपटातून आपण चांगल्या गोष्टी शिकाव्यात वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. भारत हिंदू राष्ट्र झाल्यास आनंद होईल. मात्र हे काम सरकारचे आहे. असे जया किशोरी यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT