Dia Mirza Recalls life threatening experience during her delivery Instagram
मनोरंजन

'३६ तासाच्या आत माझ्या बाळाला...', दिया मिर्झाचा हृदय पिळवटून टाकणारा अनुभव

अभिनेत्री दिया मिर्झानं २०२१ मध्ये आपल्या पहिल्या अपत्याला ज्नम दिला आहे. तिच्या मुलाचे नाव अव्यान आहे.

प्रणाली मोरे

Dia Mirza: बॉलीवूड अभिनेत्री दिया मिर्झा (Dia Mirza) आपल्या मातृत्वाचा प्रत्येक क्षण सध्या एन्जॉय करताना दिसत आहे. दिया मिर्झानं २०२१ मध्ये आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिला होता. दिया मिर्झानं नुकतेच प्रेग्नेंसी दरम्यान आलेल्या कठीण प्रसंगांविषयी सांगताना आपलं मन मोकळं केलं आहे. तिनं ते दिवस आठवत म्हटलं आहे की,''माझं बाळ हे प्रीमॅच्युइर बेबी आहे'', याव्यतिरिक्त तिनं अनेक शॉकिंग खुलासे केले आहेत.(Dia Mirza Recalls life threatening experience during her delivery)

दिया मिर्झा म्हणाली आहे की,प्रेग्नेंसीदरम्यान वेळेआधीच डिलिव्हरी झाल्यानं तिच्या आणि बाळाच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. दियानं नुकत्याच एका मुलाखतील खुलासा करत म्हटलं आहे की, प्रेग्नेंसीच्या पाचव्या महीन्यात तिला अॅपेंडिक्सची सर्जरी करावी लागली होती. या सर्जरीनंतर तिच्या शरीरात इन्फेक्शन झालं होतं. ज्यानं परिस्थिती गंभीर झाली होती.

एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत दिया मिर्झानं प्रेग्नेंसी दरम्यान झालेल्या अनेक हेल्थ संबंधित कॉम्प्लिकेशन्स वर भाष्य केलं आहे. दिया म्हणाली आहे,''माझ्या शरीरातून रक्तस्त्राव होत होता. अशात डॉक्टर म्हणाले की,बाळाला पोटातून बाहेर काढावं लागेल. आणि हे आम्हा दोघांसाठी जीवघेणं ठरलं असतं. आणि जन्मानंतर ३६ तासाच्या आत माझ्या बाळाला एका जीवघेण्या सर्जरीतून जावं लागलं''.

दिया मिर्झा म्हणाली की,जन्मानंतर केवळ २ दिवसांत माझ्या बाळाची एक सर्जरी करण्यात आली. तेव्हा मी त्याच्याजवळ राहू शकत नव्हते. पुन्हा साडे तीन महिन्यांनी आणखी एका सर्जरीतून बाळाला जाव लागलं. तो त्यावेळी NICU मध्ये होता. तो जन्मल्यानंतर जवळपास अडीच महिने त्याला जवळ घेण्याची मला परवानगी नव्हती''.

दिया मिर्झा म्हणाली,''हे सगळं कोव्हिडची दुसरी लाट आली त्या दरम्यान घडलं. दियानं आपल्या आयुष्यातील त्या कठीण प्रसंगाविषयी बोलताना सांगितलं की,माझं बाळ खूप छोटं होतं,नाजूक होतं. आणि त्या दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव होता. अशात सगळेच नियम कडक पाळावे लागत होते. मला एका आठवड्यात केवळ दोनदाच माझ्या बाळाला पहायची परवानगी होती. आणि हे एक आई म्हणून माझ्यासाठी खूप अशक्यप्राय गोष्ट होती. पण मला माहित होतं की,तो मला सोडून कुठेच जाणार नाही, तो आयुष्याची सुरू असलेली त्याची लढाई जिंकेल आणि माझ्याकडे येईल''.

दिया मिर्झाच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर ती लवकरच 'धक-धक' सिनेमातून बॉलीवूडमध्ये कमबॅक करतेय. हा एक अॅडव्हेंचरस सिनेमा आहे. एका स्त्रीच्या रोड ट्रीपवर आधारित या सिनेमाचं कथानक आहे. आता पहायचं की दियाचं कमबॅक आणि तिच्या सिनेमाचं प्रेक्षक कसं स्वागत करतायत ते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharia law : 'सत्तेत आल्यास देशात शरिया कायदा लागू करणार, हिंदूंसह मुस्लिमांना देणार अधिकार'; फैजुल करीम यांचं वादग्रस्त विधान

Shaktipeeth Highway : सतेज पाटील, राजू शेट्टींचे ‘शक्तिपीठ’विरोधात विठ्ठलाला साकडे

Ashadhi Wari 2025 : पुण्याहून पंढरपूरसाठी ३२५ अतिरिक्त बस, गाड्या शनिवारी, रविवारी धावणार; नियंत्रण कक्ष स्थापन

Maharashtra Education : विधान परिषदेत शिपायाच्या कंत्राटी पदावरून पेच; सत्ताधारी शिक्षक, पदवीधर आमदारांनीच केला सभात्याग

Ashadhi Ekadashi 2025: मुखात तुझे नाव, डोळ्यात तुझे गाव;डिगडोहमध्ये ‘विठ्ठल रखुमाईचा दर्शन सोहळा, माऊली ग्रुपचा उपक्रम

SCROLL FOR NEXT