मनोरंजन

सुशांतच्या चाहत्यांना ट्रिट; 'दिल बेचारा'तील 'ते' गाणे झाले प्रदर्शित...

संतोष भिंगार्डे

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा' हा ओटीटीवरील सर्वाधिक यशस्वी चित्रपट ठरला. अमिताभ भट्टाचार्य यांनी 'दिल बेचारा' या चित्रपटाची गीते लिहिली, तर ए. आर. रेहमान यांनी संगीत दिलं आहे. मुकेश छाबरा दिग्दर्शित या चित्रपटाच्या संगीताने अगोदरच लोकप्रियता मिळविली होती आणि आता त्यातील एक गाणे खास लोकग्रहास्तव प्रदर्शित करण्यात आले आहे. 'मसखरी' असे ते गाणे आहे.  

या चित्रपटाच्या संगीतावर अफाट प्रेम सुशांतच्या चाहत्यांनी केले आहे आणि करत आहेत. आता त्यांच्या विनंतीवरून सोनी म्युझिक इंडियाने या चित्रपटाचे 'मसखरी' हे गाणे प्रदर्शित केले. हे गाणे सुनिधी चौहान आणि हृदय गट्टानी यांनी गायले आहे. आनंदी आणि विनोदी असलेले हे गाणे आयुष्यातील सर्व समस्या सोडवण्याचा संदेश देते. हे गाणे चित्रपटाच्या आधी रिलीज झाले नव्हते. पण आता चित्रपटाच्या रिलीजनंतर या गाण्यांचे खूप कौतुक झाले आहे आणि प्रेक्षकांच्या विनंतीनुसार हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे.

सुनिधी चौहान या गाण्याबद्दल बोलताना म्हणाली, “मसखरी हे एक अतिशय मजेशीर गाणे आहे ज्याचे अनेक मनोरंजक भाग आहेत.  ए.आर. रेहमान सर यांचे गाणे माझ्यासाठी नेहमीच खास राहिले आहे. अमिताभ भट्टाचार्य यांनी हे गाणे आणखी मनोरंजक बनवून अप्रतिम पद्धतीने शब्दात मांडले आहे. आता हे गाणे प्रदर्शित झाल्याने मी खूप उत्सुक आहे."

गायक हृदय गट्टानी म्हणाला की, "सुनिधीबरोबर हे गाणे गाणे हा एक अद्भुत अनुभव होता. हे एक अतिशय रोमांचक गाणे आहे आणि या गाण्यासाठी अमिताभ भट्टाचार्य यांचे शब्द खूप रंजक आहेत. आज हे गाणे रिलीज झाले याचा मला खूप आनंद आहे आणि मी प्रेक्षकांच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे."

मुकेश छाबरा दिग्दर्शित 'दिल बेचारा' या चित्रपटात सुशांतसिंग राजपूत आणि संजना सांघी मुख्य भूमिकेत आहेत. 24 जुलैला डिस्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज झालेल्या या चित्रपटाने अनेक विक्रम नोंदवले. सोनी म्युझिक इंडिया निर्मित आणि ए.आर. रहमान यांनी संगीतबद्ध केलेल्या या चित्रपटाच्या गाण्यांचा संपूर्ण अल्बम आता प्रेक्षकांसामोर आला आहे.
----
संपादन : ऋषिराज तायडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

Nagpur News: मनपाची संपूर्ण मालमत्ता येणार डिजिटल ट्रॅकवर; एका क्लिकवर मिळणार संपूर्ण कामांचा इतिहास, खर्च आणि देखभालीची माहिती

Nagpur News: एअर होस्टेसची आत्महत्या; प्रेमसंबंधातील वादातून उचलले टोकाचे पाऊल

Nagpur News: हुंड्यासाठी विवाहितेचा छळ पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा; तहसील ठाण्याच्या हद्दीतील घटना

Buldhana News: उल्कापाताच्या खाणाखुणा आता नव्या रुपात झळकणार!; विभागीय आयुक्तांच्या प्रस्तावाला हिरवा कंदील; ९.८८ कोटींच्या निधीला मंजुरी !

SCROLL FOR NEXT