Dipika Kakar pregnancy talks about her career Esakal
मनोरंजन

Dipika Kakar: 'उगीच माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ..', दिपिका कक्कड अफवा पसरवणाऱ्यांना चांगलंच झापलं

Vaishali Patil

'ससुराल सिमर का..' सारख्या प्रसिद्ध मालिकांमधून स्वतःची ओळख बनवणारी दीपिका कक्कर ही लवकरच आई होणार आहे. त्यामुळे ती सातत्याने चर्चेत देखील आहे. ती तिचे व्हिडिओ आणि फोटो चाहत्यासोबत शेयर करत असते. त्यातच काल मिडियामध्ये दीपिका चर्चेत आली त्याच कारण होत की आता काम करणार नाही आहे.

तिने एका मुलाखतीत सांगितले आहे की ती तिच्या आयुष्यातील या टप्प्याचा आनंद घेत आहे. त्यामुळेच तिने शोएबला ती पुढे काम करायचं नसल्याचं सांगितलं आहे. तिला अभिनय सोडायचा आहे.

आता ती गृहिणी आणि आई म्हणून आयुष्य घालवणार आहे. असं वक्तव्य तिनं केलं असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यामुळे ती आई झाल्यानंतर अभिनय क्षेत्र सोडणार आणि घर सांभाळणार अशा बातम्याही आल्या. यावर तिच्या चाहत्यांनी नाराजीही व्यक्त केली होती. मात्र आता दीपिकानं या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनय सोडण्याचा माझा कोणताही विचार नसल्याचं तिनं सांगितलं. ती सध्या ब्रेकवर असून हा टप्पा एन्जॉय करत असल्याचं तिनं सांगितलं.

लवकरच होणारी आई दीपिका ने ई टाइम्स टीव्हीला सांगितले की, काही तरी गैरसमज झाला आणि तिच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला गेला. दीपीका म्हणाली की अभिनय सोडण्याचा तिचा कोणताही विचार नाही. ती आपल्या मुलाला वेळ देण्यासाठी काही वर्षे नक्कीच ब्रेक घेऊ शकते. दीपिका कक्कर म्हणाली की तिला गृहिणी म्हणून खूप मजा येते.

वर्षानुवर्षे डेली सोपमध्ये काम केल्यानंतर तिला गृहिणीच्या जीवनाची आकांक्षा आहे. पण याचा अर्थ त्याने अभिनय सोडला असा नाही. दीपिका म्हणाली की, मुलाच्या जन्मानंतर तिला मोठा प्रोजेक्ट मिळाला तर ती लवकरच पुन्हा कामाला सुरुवात करू शकते. त्यामुळे आता बाळ झाल्यानतंरच मी याबद्दल बोलू शकेल.

दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम हे टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात क्यूट कपल आहे. त्यांनी 2018 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. दीपिका आणि शोएबच लग्न मूळ गावी मौदाहा, यूपीमध्ये झाला होता. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर दीपिका कक्करने लग्नानंतर फारसे काम केलेले नाही आणि ती फक्त ' कहाँ हम कहाँ तुम' या मालिकेत दिसली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Forecast : महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी, पण ‘या’ भागांत मुसळधार सरी कोसळणार; आज तुमच्या जिल्ह्यांत कसे असेल हवामान? जाणून घ्या

Narendra Modi Foreign Tours: सात महिन्यांत ७४.५९ कोटी खर्च! पंतप्रधान मोदींच्या विदेश दौऱ्यांची आकडेवारी जाहीर, राज्यसभेत खुलासा

Indian Fishing Boat: भारतीय बोटीला अपघात; ११ मच्छीमारांना श्रीलंकेच्या नौदलाने वाचवले, खवळलेल्या समुद्रात मध्यरात्री अनुभवला थरार..

तर काय ?

Maratha Reservation: मनोज जरांगे कुणाच्या अजेंड्यावर काम करत होते? लक्ष्मण हाके यांचा खळबळजनक आरोप, संविधानाला आव्हान देऊ नका

SCROLL FOR NEXT