Fans Whistled After seeing hrithik roshan and saif ali khan clash in  vikram vedha, 5 reasons responsible to boycott vikram vedha
Fans Whistled After seeing hrithik roshan and saif ali khan clash in vikram vedha, 5 reasons responsible to boycott vikram vedha Google
मनोरंजन

Boycott Vikram Vedha: 'या' 5 कारणांनी लोक 'विक्रम वेधावर' घालतायत बहिष्कार

प्रणाली मोरे

Boycott Vikram Vedha: बॉलीवूडमध्ये आता आणखी एक बिग बजेट सिनेमा रिलीज व्हायला निघाला आहे, तो म्हणजे(Hrithik Roshan)हृतिक रोशन-सैफ अली खानचा(Saif ALi Khan) विक्रम वेधा(Vikram Vedha). हा सिनेमा याच नावाच्या साऊथ सिनेमाचा रीमेक आहे. आर माधवन आणि विजय सेतुपति यांच्या या सिनेमाने दक्षिणेत दमदार बिझनेस केला होता. बॉलीवूडच्या 'विक्रम वेधा' सिनेमात हृतिक रोशन आणि सैफ अली खान मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. सिनेमाचा टिझर २४ ऑगस्ट रोजी रिलीज झाला आहे आणि टीझर समोर आल्यावर सोशल मीडियावर बॉयकॉट ट्रेन्ड सुरू झाला. बरं बॉयकॉट करण्याची एक-दोन कारणं नाहीत तर चक्क ५ कारणं आहेत.(Fans Whistled After seeing hrithik roshan and saif ali khan clash in vikram vedha, 5 reasons responsible to boycott vikram vedha)

ट्वीटरवर #Boycottvikramvedha ट्रेंड सुरु आहे. पण हा ट्रेन्ड का सुरु गेला याविषयी जाणून घेण्याआधी थोडं सिनेमाविषयी जाणून घेऊया. 'विक्रम वेधा' हा एक Action-थ्रिलर सिनेमा आहे, जो हृतिक रोशन आणि सैफ अली खान अभिनित ,पुष्कर-गायत्री लिखित-दिग्दर्शित सिनेमा आहे. २०१७ मध्ये या नावाचा तामिळ सिनेमा आला होता,ज्याचा 'विक्रम वेधा' हिंदी रीमेक आहे. याचं बजेट जवळपास १७५ करोडचं आहे. ३० सप्टेंबर रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.

आता जाणून घेऊया विक्रम वेधावर लोक बहिष्कार का घालत आहेत?

याचं सगळ्यात मोठं आणि पहिलं कारण आहे हृतिकनं आमिर खानला लाल सिंग चड्ढासाठी दिलेला पाठिंबा. आमिर खानच्या लाल सिंग चड्ढाला खूप मोठ्या प्रमाणात बॉयकॉट केलं गेलं. तर हृतिकने आमिर आणि त्याच्या सिनेमाची प्रशंसा करण्यासाठी नेमकं ट्वीटर हेच प्लॅटफॉर्म वापरलं,जिथे आमिरच्या सिनेमावर बॉयकॉट ट्रेन्ड सुरु झाला. त्यामुळे झालं असं की, ट्रोलर्सला आयतच कोलित मिळालं. आणि हृतिकसोबत 'विक्रम वेधा' या त्याच्या सिनेमावर लोक बहिष्कार घालू लागले. तर इथून सुरुवात झाली 'बॉयकॉट विक्रम वेधा ट्रेन्ड'ची.

ट्वीटरवर नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की,जेव्हा २०१७ मध्ये विक्रम वेधा तामिळमध्ये बनला होता आणि त्याला हिंदीत डब केलं गेलं होतं, तर मग थिएटरमध्ये जाऊन पुन्हा जुनी कहाणी पहाण्यासाठी पैसे खर्च का करायचे?

हृतिक आणि सैफ अली खान अभिनित विक्रम वेधावर तामिळ सिनेमातील प्रत्येक गोष्टीची नक्कल केल्याचा आरोप केला जात आहे. हृतिक आणि सैफनं साऊथच्या सिनेमाची हुबेहूब नक्कल करताना त्या सिनेमातील कलाकारांसारखेच कपडेही घातले आहेत. मग लोक म्हणतायत, नक्कल केलेला सिनेमा पहायचाच कशाला?

आता जरा अभिनयाविषयी बोलूया. टीझरमध्ये हृतिक रोशनचा अभिनय पाहून लोक हैराण झालेत. लोकांचे म्हणणे आहे की,हृतिकचा लूक दमदार आहे,पण तो जेव्हा संवाद बोलायला तोंड उघडतो तेव्हा त्याचाच 'सुपर 30' आणि 'कोई मिल गया' आठवतो. यावरनं लोक आता विजय सेतुपतीची प्रशंसा करत सुटलेयत. ते म्हणतायत,विजयच्या १ टक्के देखील हृतिकला जमलेलं नाही. ज्या पद्धतीनं विजयनं तो रोल साकारलाय,हृतिक त्यापुढे फिका पडला.

बॉलीवूडविषयी आधीच ट्रोलर्सच्या मनात राग भरलाय. त्यांनी आरोप केला आहे की बॉलीवूड सिनेमे हिंदू धर्माचा अपमान करत सुटलेयत. काही नवीन त्यांना सिनेमात आणताच येत नाही. कधी ते दक्षिणेतल्या सिनेमांची नक्कल करतात, तर कधी हॉलीवूडचा रीमेक बनवण्यात टाईमपास करतात. आणि म्हणूनच लोक बॉलीवूड बॉयकॉट म्हणू लागलेत.

आता या बॉयकॉट ट्रेन्डमध्ये सुशांत सिंग राजपूतचे चाहते देखील सामिल आहेत. त्यांचे म्हणणे आहे की,सुशांतला खूप त्रास दिलात. म्हणून आता तुमच्या हिंदी सिनेमांना आम्ही देखील पाहणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सभेला येतात पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरे काय म्हणाले?

Pune School: स्कॉरलशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट

Sharad Pawar on Narendra Modi: नरेंद्र मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलं... शरद पवारांचा पलटवार! नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT