Ajay Devgan- Runway 34
Ajay Devgan- Runway 34 Google
मनोरंजन

पायलट फेडरेशनने अजय देवगणला फटकारलं; म्हणाले,'Runway 34 सिनेमात सगळंच ...'

प्रणाली मोरे

बॉलीवूड अभिनेता अजय देवगण(Ajay Devgan) आणि त्याचा सिनेमा 'Runway 34 ला 'फेडरेशन ऑफ इंडियन पायलटनं' मोठा झटका दिला आहे. सिनेमात दावा केला आहे की,याचं कथानक सत्य घटनांवर आधारित आहे. परंतु,फेडरेशनचं म्हणणं आहे की,''हा सिनेमा पूर्णपणे काल्पनिक कथेवर आधारित आहे''. एकतर केजीएफ २ मुळे बॉक्सऑफिसवर या सिनेमाची अवस्था पहिल्यापासूनच वाईट आहे. चार दिवसांत 'Runway 34 ने फक्त १५.३५ करोडचा बिझनेस केला आहे. सिनेमासंदर्भात दावा करण्यात आला होता की,२०१५ मध्ये दोहा वरुन कोचिनला येणाऱ्या फ्लाइटच्या क्रॅश लॅंडिगवर या सिनेमाचं कथानक आधारित आहे. हवामान खराब असल्याकारणानं आणि व्हिजिबिलिटी लो असल्यानं विमान दुर्घटना झाली होती आणि यामध्ये बऱ्याच विमान प्रवाशांचा मृत्यू झाला होता. परंतु पायलेट फेडरेशनचं म्हणणं आहे की सिनेमात जे दाखवलं गेलं आहे त्यात खरं घडलंय ते दाखवलेलंच नाही. सत्य घटनेपासून सिनेमा खूप लांब आहे.

पायलट फेडरेशनचे सेक्रेटरी कॅप्टन सीएस रंधावा यांनी यासंदर्भात एक निवेदन जारी करत 'Runway 34 सिनेमावर टिका केली आहे. आपल्या निवेदनात रंधावा यांनी म्हटलं आहे,''सिनेमात पायलटच्या प्रोफेशनलला जसं दाखवलं गेलं आहे ते,सत्यापासून खूप दूर आहे. सिनेमात जे दाखवलं गेलंय त्यामुळे विमान प्रवाशांच्या मनात खूप चुकीचे भ्रम निर्माण होऊ शकतात''.

कॅप्टन रंधावा पुढे म्हणाले,''आम्ही सगळे मनोरंजन म्हणून सिनेमाकडे पाहिलं तर दिग्दर्शक आणि त्याच्या कामाची प्रशंसा करू. पण ज्या पद्धतीनं कथा रोमांचक दाखवण्याच्या नादात एअरलाइन पायल्ट्सचं प्रोफेशन चुकीच्या पद्धतीनं दाखवणं आणि तसंच आहे असा दावा करणं हे मात्र मुळीच योग्य नाही. पायलट्स रोज हजारो फ्लाइट्सची जबाबदारी आणि त्यातील प्रवाशांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य देत विमानासह आकाशात भरारी घेत असतात सिनेमात जी व्यक्तिमत्त्व दाखवली आहेत ती खऱ्या अर्थानं प्रत्यक्ष जीवनात असलेल्या खऱ्या व्यक्तिमत्त्वांचं मुळीच प्रतिनिधित्त्व करीत नाहीत. आमच्या इंडस्ट्रीत उड्डण करताना मादक पदार्थांचं प्रमाण रक्तात झिरो पर्सेटं लागतं. आमचे पायलट कंपनीच्या नियमांना तोडत नाहीत तसंच विमान प्रवाशांचा जो भरोसा त्यांच्यावर असतो त्याच्या वर खरं उतरण्यासाठी काहीही करू शकतात. त्यांचं प्रोफेशन त्यांच्यासाठी सर्वात उंचावर आहे''.

अजय देवगण,अमिताभ बच्चन आणि रकुल प्रीत सिंग Runway 34 सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. २९ एप्रिल,२०२२ रोजी हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाच्या माध्यमातून अजय देवगणनं दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

ढिंग टांग : महाशक्तीचे महावाटप...!

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 03 मे 2024

आंबा : उन्हाळ्याचा अनभिषिक्त राजा

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SCROLL FOR NEXT