Avinash Das Google
मनोरंजन

बॉलीवूड दिग्दर्शकावर FIR, अमित शाह यांचा 'तो' फोटो व्हायरल करणं पडलं महागात

दिग्दर्शक अविनाश दासवर अहमदाबाद पोलिसांच्या डिटेक्शन ऑफ क्राइम ब्रांच युनिटनं तक्रार दाखल केली आहे.

प्रणाली मोरे

काही दिवस आधी झारखंडच्या IAS ऑफिसर पूजा सिंघलच्या(Pooja singhal) सी.ए कडून ईडीनं(ED) जवळपास १७ करोडची रक्कम जप्त केली होती. यादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाल होता. त्यानंतर पूजा सिंघलला मनी लॉंन्ड्रिंग केसमध्ये ईडीनं अटक देखील केली होती. आणि त्यामुळे तिला निलंबितही करण्यात आलं होतं. आता अनारकली ऑफ आरा आणि अशा एक-दोन बॉलीवूड सिनेमांचा दिग्दर्शक अविनाश दास(Avinash Das) वर अहमदाबाद पोलिसांच्या डिटेक्शन ऑफ क्राइम ब्रांच युनिटनं तक्रार दाखल केली आहे. दिग्दर्शकानं आपल्या ट्वीटर अकाऊंटवर अमित शाह(Amit Shah) सोबतचा पूजा IAS पूजा सिंघलचा फोटो शेअर केला आहे.

पोलिसांचे म्हणणं आहे की अविनाश दासने जो फोटो शेअर केला आहे त्यात केंद्रिय मंत्री अमित शाह(Amit Shah) आणि IAS पूजा सिंघल एकमेकांसोबत बातचीत करताना दिसत आहेत. हा फोटो २०१७ मधील एका सार्वजिनक कार्यक्रमातील आहे. लोकांमध्ये या फोटोच्या माध्यमातून चुकीची समजूत निर्माण करणे आणि अमित शाह यांच्या इमेजला धक्का पोहोचवण्याचा आरोप दिग्दर्शकावर करण्यात आला आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की याधीही अविनाश दासने आपल्या फेसबूक अकाऊंटवरनं एका महिलेची मॉर्फ इमेज शेअर केली होती,ज्यामध्ये तिनं फक्त तिरंगा अंगावर लपेटला होता.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार दिग्दर्शकाची फेसबूक पोस्ट १७ मार्चची आहे आणि शाह यांच्या सोबतचा फोटो ८ मे ला शेअर केला होता. अमित शाह आणि पूजा सिंघल यांचा फोटो शेअर करीत दिग्दर्शकानं ट्वीट मध्ये लिहिलं होतं,''घरातून करोडोंची रक्कम ईडीच्या हाती लागण्याच्या काही दिवस आधीचा पूजा सिंघल यांचा एक फोटो''. क्राइम ब्रांच कडून यांसदर्भात जे स्पष्टिकरण जारी करण्यात आलं आहे त्यात दिग्दर्शक अविनाश दासने तिंरगा अंगात लपेटलेल्या महिलेचा अश्लील फोटो हा राष्ट्रीय ध्वजाचा अपमान करण्याच्या हेतूनं पोस्ट केला होता. अविनाश दासवर जालसाजी आणि IT Act अंतर्गत अमित शाह आणि सिंघल यांच्या संदर्भातली खोटी पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी आणि राष्ट्रीय ध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली आहे. या तक्रारी अंतर्गत अविनाश दासचं ट्वीटर अकाऊंटही बंद करण्यात आल्याचं बोललं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानला खरंच T20 World Cup चा गांभीर्य असेल तर...! R Ashwin ने सांगितला विजयाचा मंत्र, इंग्लंडला अडचणीत आणणारी चाल...

जुन्या आठवणी आणि नव्या कथा; मराठी भाषा गौरव दिनानिमित्त घरबसल्या पाहा हे ब्लॉकबस्टर मराठी चित्रपट

Latest Marathi News Live Update : कोयता गँग पुन्हा सक्रिय, 12 वीच्या विद्यार्थ्यावर हल्ला

MHT CET Admission : ‘एमएचटी सीईटी’च्या प्रवेश नोंदणीस २७ फेब्रुवारीपर्यंत विलंब शुल्कासह मुदतवाढ

Thane News: मुरबाड नगर पंचायतमध्ये सत्तांतराची नांदी? नगराध्यक्ष संतोष चौधरींची कसोटी; किसन कथोरेंना शह देणारे आता भाजपच्या गोटात

SCROLL FOR NEXT