Hemangi kavi shared post about her leg injury after she perform in marathi drama  sakal
मनोरंजन

Hemangi kavi: चिघळलेली दुखापत, पायाला सूज.. तरीही हेमांगी प्रयोगाला उभी राहिली.. आणि मग जे झालं..

पायाची जखम चिघळून पाय सुजला तरीही... हेमांगीने हार मानली नाही..

नीलेश अडसूळ

hemangi kavi : अभिनेत्री हेमांगी कवी सध्या स्टार प्रवाह वरील 'मन धागा धागा' या मालिकेत पाहुणी कलाकार पण आत्यं महत्वाच्या भूमिकेत झळकली आहे. अत्यंत वेगळी अशी तिची भूमिका असून तिचे चाहते या भूमिकेवर प्रचंड खुश आहेत.

हेमांगीने नुकतीच या मालिकेत एंट्री घेतली असून सध्या ती चित्रीकरणात व्यस्त आहे. याच मालिकेच्या चित्रीकरणा दरम्यान हेमांगीच्या पायाला मोठी दुखापत झाली. पण ही दुखापत होऊनही तीने चित्रीकरण थांबवले नाही.

पण त्यानंतर जखम आणखी चिघळली आणि नाटकाचा प्रयोग तोंडावर आला होता, मग जे काही घडलं हे सगळं हेमांगीने पोस्ट करून शेयर केलं आहे.

हेमांगीने लिहिलं आहे की, ''परवा ‘मन धागा धागा’ च्या set वर scene करताना माझ्याकडूनच माझ्या पायाला दुखापत झाली. पायरी चढत असताना माझा अंदाज चुकला आणि पाय पायरीला जोरात आपटला. पायाच्या बोटाचं नख माझ्याच बोटात मागच्या मागे घुसलं. असली कळ गेली डोक्यात.''

''Shooting थांबवून आराम करायची ती वेळ नव्हती कारण already खूप उशीर झाला होता. Pack up ची वेळ उलटून गेली होती. म्हटलं आता जर मी माझ्या पायाला गोंजारत बसले तर जशी ती कळ माझ्या डोक्यात गेलीए तशी मी सगळ्यांच्या डोक्यात जाईन. काही नाही काही म्हणत scene पूर्ण केला.''

''Pack up झालं. पाय झणझणत होता. चालवत ही नव्हतं. चप्पल घलता येत नव्हती. कशी बशी घरी पोचले. घरी आल्यावर बघते तर काय पाय टम्म सुजला होता. Fresh होऊन बर्फाचा शेक दिला पण मी इतकी थकले होते की मी झोपी गेले.''

''काही वेळापुरतीच. थोड्या थोड्या वेळाने सारखी जाग येत होती. पाय प्रचंड झोंबत होता.
पण याही पेक्षा पाय जर असाच राहीला तर उद्याचा नाटकाचा प्रयोग कसा करणार या विचाराने अस्वस्थ होऊन झोपमोड होत होती. सकाळी पुन्हा बर्फ लावला. नाटकाच्या rehearsal ला पोचले.''

''मी लंगडतेय पाहून सगळेच काळजीत पडले. माझ्याही आणि उद्याच्या प्रयोगाच्याही! तिथेही मनाचा हीय्या करून आई गं आई गं करत rehearsal केली. आराम न दिल्यामुळे जखम खवळली. आता म्हटलं हीचा दादापूता नाही केला तर ही मला उद्याचा प्रयोग करू द्यायची नाही.''

''घरी गेल्या गेल्या मैत्रिणीने सुचवलेला तुरटी-हळदीची लेप लावला पायाला. दुखणं शांत झालं. Rehearsal चांगली झाली होती म्हणून झोप ही पटकन लागली आणि चांगली झाली.
प्रयोगाचा दिवस उजाडला. रक्त साकळून बोट काळं निळं झालं होतं.''

''मनात म्हटलं nothing doing. काल जशी लंगडत तालिम केली तसाच आज प्रयोगही करायचा. लंगडल्यामुळे दुसरा पाय ही दुखू लागला. Theatre ला पोचले. Make up, Costume घालून ready झाले. सगळे माझ्या दुखण्याचं, लंगडण्याचं सांत्वन करत होते. मी विंगेत उभी होते.''

पुढे हेमांगीनं (Hemangi kavi) लिहिलं आहे की, ''तिसरी घंटा झाली. पडदा उघडला. संगीत सुरू झालं. Lights आले आणि मी entry घेतली. Entry लाच मी धावत train पकडतेय असा scene आहे नाटकात. मी धावले आणि त्यानंतरचे २- २.१५ तास मी रंगमंचावर तरंगत होते. मला दुखापत झालीए. माझे पाय दुखताएत. हवा लागली तरी सहन होत नाहीए हे सगळं सगळं विसरून गेले मी. काय गंमत झाली?…''

''काही तासांपूर्वी विव्हळणारी मी जणू काही झालंच नाही अशी वावरले. जादू व्हावी तसं.
पण खरंच आहे ही जादूच असते. कलेची जादू. परकाया प्रवेशाची जादू. त्यावेळी साकारत असलेल्या पात्रामध्ये आपण उरतच नाही. त्यामुळे आपली दुःखं, यातना, क्लेश शारिरीक आणि मानसिक सुद्धा काही काही उरत नाही आपल्यात. या गोष्टीचा मला फायदा झाला. प्रयोग संपल्यावर मला जाणवलं माझं दुखणं खुप कमी झालं होतं.''

''या क्षेत्राची मला हीच गोष्ट आवडते. वेगवेगळी characters केल्यामुळे, करताना आपल्या वैयक्तिक दुखांमधून पटकन सावरता येत आम्हांला. मला वाटतं फक्त अभिनय क्षेत्रच नाही तर जगातली कुठलीही कला तुम्हांला सावरायला मदतच करते. तिने पुढे केलेला मदतीचा हा हात धरायचा की नाही हे आपल्या हातात असतं.''

''‘जन्मवारीचा’ पहीला प्रयोग माझ्या कायम स्मरणात राहील.
कलादेवता, नाट्यदेवता कालच्या सारखी कृपा कायम ठेवा माझ्यावर!'' अशी भावनिक पोस्ट हेमांगीने शेयर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT