Pamela Anderson Instagram
मनोरंजन

Pamela Anderson: '80 वर्षाच्या वृद्धासोबतची ती रात्र..', आत्मचरित्रातून पामेलाचा धक्कादायक खुलासा

आपल्या वैयक्तिक आयुष्यात पाच लग्न करणाऱ्या पामेलानं आपल्या पुस्तकात ती २० वर्षाची होती तेव्हाचा एक अनुभव शेअर केलाय जो ऐकून सगळेच हैराण झाले आहेत.

प्रणाली मोरे

Pamela Anderson: हॉलीवूड अभिनेत्री आणि प्रसिद्ध मॉडेल पामेला एंडरसननं आपल्या आत्मचरित्रात कितीतरी मोठे खुलासे केले आहेत.

पाच लग्न करणाऱ्या पामेलानं आपल्या पुस्तकात लिहिलं आहे की,जेव्हा ती २० वर्षाची होती,तेव्हा तिनं एका ८० वर्षाच्या वृद्धासोबत डान्स केला होता..जी रात्र ती आजपर्यंत विसरली नाही.

पामेलानं आपल्या पुस्तकात म्हटलं आहे की ८० वर्षाच्या त्या वृद्धासोबत डान्स करताना हळूवार झालेला स्पर्श आणि श्वास रोखून धरण्याचा अनुभव खूपच कामूक होता.(Hollywood Actress Pamela Anderson Autobiography Shocking truth)

नुकतीच पामेला एंडरसनचं आत्मचरित्र 'लव,पामेला.' पब्लिश झालं आहे. यामध्ये खास गोष्ट ही आहे की तिनं आत्मचरित्रातला प्रत्येक शब्द स्वतः लिहिला आहे. या पुस्तकासाठी तिनं कोणाचंही सहाय्य घेतलेलं नाही.

'लव पॅमेला' मध्ये आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी तिनं अनेक खुलासे केले आहेत. यामध्ये तिनं सांगितलं आहे की,'जेव्हा ती २० वर्षांची होती तेव्हा तिनं एका ८० वर्षांच्या वृद्ध व्यक्तीसोबत सेक्सी डान्स स्टेप्स केले होते'.

पामेलाचं म्हणणं आहे की त्या वृद्ध व्यक्तीनं त्या रात्री तिला केलेला स्पर्श तिच्या कायम स्मरणात राहिला..आणि आजतागायत त्या तशा स्पर्शाचा अनुभव पुन्हा तिला कोणीच देऊ शकलं नाही.

पामेलानं तो डान्स अर्जेंटिनाच्या ब्योनस एयर्स मध्ये केला होता. ज्यानंतर तिला 'सर्वात जास्त सेक्सी,कामुक' असं संबोधलं जाऊ लागलं. तिचं म्हणणं आहे की त्या क्षणानं तिला खूप बदललं.

आपल्या माहितीसाठी इथं थोडक्यात सांगतो की,पामेलानं पाच लग्न केली आहेत. यातील एका पुरुषासोबत तिनं दोनदा लग्न केलं.

आपल्या पुस्तकात तिनं ज्युलियन असांजेला आपला जवळचा मित्र म्हणून संबोधलं आहे. ती लंडनमध्ये असताना त्याला अनेकदा भेटायची.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Rate: ग्राहकांना फटका, शेतकऱ्यांना नाही दिलासा; गोकुळने गाय दुधाचा विक्री दर वाढवला

Latest Marathi News Live Update : गोकुळकडून गाय दुधाच्या विक्री दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ

एकतर तुम्ही मरणार किंवा... 'तुला जपणार आहे' फेम अभिनेत्याचा हात पाहून गुरुजींनी केलेली भविष्यवाणी खरी ठरली

Indian Cricket: द्रविडने नाकारला गंभीरचा 'सुपरस्टार कल्चर'चा दावा; म्हणाला, "कोणत्याही खेळाला हिरोची गरज आणि..."

Thane Traffic: ठाणेकरांनो लक्ष द्या! 'हा' रस्ता २०२७ पर्यंत बंद; कोणत्या वेळेत वाहतूक सुरू राहणार?

SCROLL FOR NEXT