Honey Singh Breakup Esakal
मनोरंजन

Honey Singh Breakup: हनी सिंग-टीना थडानीचं ब्रेकअप... वर्षभरातच असं काय बिनसलं?..वाचा

गेल्या वर्षी एप्रिल २०२२ दरम्यान हनी आणि टीना मधील जवळीकता वाढताना दिसली होती. तेव्हा नुकताच हनीचा घटस्फोटही झाला होता.

प्रणाली मोरे

Honey Singh Breakup: गायक हनी सिंगची सध्या सलमान खानच्या 'किसी का भाई किसी जान' सिनेमातील 'छोटू मोटू..' या नव्या गाण्यामुळे सगळीकडेच चर्चा रंगली आहे. मोठ्या कालावधीनंतर हनी सिंग दणक्यात बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. गेल्या काही काळापासून हनी सिंगच्या आयुष्यात मोठी उलथा-पालथ सुरू आहे.

हनी सिंग आपली पत्नी शालिनी तलवारपासून विभक्त होत टीना थडानीला डेट करत होता, पण आता बातमी आहे की टीनासोबत देखील त्याचं ब्रेकअप झालं आहे. बातमी खरी आहे हे सिद्ध होतंय कारण दोघांनी सोशल मीडियावरनं आपले एकमेकांसोबतचे फोटो डिलिट केले आहेत.(Honey Singh Breakup with girlfriend tina thadani, honey busy in salmans movie promotion)

हनी गेल्या काही दिवसांपासून टीनासोबतच्या त्याच्या अफेअरमुळे चर्चेत होता. पण दोघांचं असं अचानक वेगळं होणं चाहत्यांना मात्र हैराण करून गेलं आहे. गेल्या वर्षी एप्रिल २०२२ दरम्यान हनी आणि टीना मधील जवळीकता वाढताना दिसली होती. दोघं कामाच्या निमित्तानं एकमेकांच्या जवळ आले. आणि तेव्हापासूनच हनी सिंग आणि टीना यांच्या डेटिंगच्या बातम्या आल्या. स्वतः हनीनं टीनासोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते.

बातमी आहे की हनी सिंग आणि टीना या दोघांनाही आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचे आहे,त्यामुळे त्यांनी आपल्या वाटा वेगळ्या केल्या आहेत. अर्थात याप्रकरणा संबंधी अद्याप हनी सिंग किंवा टीना या दोघांपैकी कुणीच अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याच्या बातम्या मात्र समोर आल्या होत्या.

याआधी एका मुलाखतीत हनी सिंगनं आपल्या ब्रेकअपविषयी इशाऱ्यामधनं सूचित केलं होतं. हनी सिंग म्हणाला होता की, त्याला आपल्या मागील अल्बममध्ये खूप गोष्टी बदलाव्या लागल्या होत्या कारण तो प्रेमात होता पण आता नाही. आता हनी सिंगच्या या अशा वक्तव्याला समोर ठेवून सगळेच याचा संबंध त्याच्या ब्रेकअपशी जोडत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT