Indian Idol Marathi Finale
Indian Idol Marathi Finale sakal
मनोरंजन

जनमताचा 'कौल' आला.. आज जाहीर होणार इंडियन आयडल मराठीचा महाविजेता

नीलेश अडसूळ

Tv Entertainment: 'इंडियन आयडल मराठी' या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. 'अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा' अशी टॅगलाईन असलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून स्पर्धक आले होते. सध्या या महापर्वाच्या महाअंतिम सोहळ्याची जोरदार चर्चा आहे. या पर्वातील टॉप ५ स्पर्धक तोडीस तोड सादरीकरण करत असताना नेमकं विजेतेपद कोण पटकावणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (Indian Idol Marathi Finale)

जगदीश चव्हाण, प्रतीक सोळसे, सागर म्हात्रे, श्वेता दांडेकर आणि भाग्यश्री टिकले हे पाच स्पर्धक अंतिम फेरीत पोचले असुन आज त्याबाबत निकाल लागणार आहे. गेली दोन दिवस हा सोहळा अत्यंत दिमाखात रांगला. या तीन दिवसीय सोहळ्याचा हा शेवट आहे. आज रात्री महाराष्ट्राला इंडियन आयडल मराठी च्या पहिल्या पर्वाचा महाविजेता मिळणार आहे.

हे पर्व विशेष गाजले. कारण अंतिम फेरीत निवडले गेलेल्या पाचही स्पर्धकांचा आवाज, त्यांची धाटणी पूर्णतः वेगळी आहे. त्यामुळे लोकगीतापासून ते शास्त्रीय संगीतापर्यंत सर्व काही एकाच मंचावर प्रेक्षक अनुभवत आहेत. या महाअंतिम सोहळ्यात नुकतीच अमृता खानविलकरने हजेरी लावली. केवळ हजेरीच नाही तर तिने डान्सही केला. संगीत दिग्दर्शक अजित परब याने देखील आपल्या गाण्याने मंत्रमुग केलं. तर आजच्या भागात प्रियांका बर्वे आणि प्रतीक एकत्र सादरीकरण करणार आहेत.आजच्या भागाचे विशेष म्हणजे या सोहळ्याचे परीक्षण करणारे 'अजय अतुल' (ajay atul) देखील आज सादरीकरण करणार आहेत.

नाशिक जिल्यातला निफाडचा जगदीश, दिंडोरीचा प्रतीक, पनवेलचा सागर, वसईची श्वेता आणि नागपूरची भाग्यश्री टिकले या स्पर्धकांनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर, परीक्षकांच्या गुणांनी आणि प्रेक्षकांच्या मताच्या आधारे टॉप ५ मध्ये बाजी मारली आहे, आजचा निकाल हा जनतेच्या हातात आहे. या पाचही स्पर्शकांनी आपल्याला मत देण्यासाठी प्रेक्षकांना आवाहन केले होते. या स्पर्धकांवर भरभरून प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी यांना भरभरून मतदान केलं आहे. जनमताचा हा कौल एका लिफाफ्यात कैद झाला अजून आज रात्री अजय अतुल त्याची घोषणा करतील.

आपल्या गावातील, शहरातील स्पर्धक विजेता व्हावा अशी प्रत्येक भागातील लोकांची इच्छा आहे. पण प्रत्येकानेच आपले सर्वस्व पणाला लावून सादरीकरण केले आहे. नालासोपाऱ्याची श्वेता दांडेकर (shweta dandekar) हिने जवळपास सगळ्या प्रकारातली गाणी गायल्याने तीच्या बाजूने प्रेक्षकांचा अधिक कल जाणवतो आहे. शिवाय निफाडच्या जगदीश चव्हाणबाबतही (jagdish chavhan) जनमत झुकताना दिसत आहे. त्यामुळे या दोघांपैकी एक कुणीतरी विजेता होईल अशी चर्चा नेटकऱ्यांमध्ये आहे. परंतु पाचही स्पर्धक तोडीस तोड असल्याने नेमका निकाल काय लागतोय हे आज रात्रीच कळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT