Ira-Nupur Shikhare esakal
मनोरंजन

Ira-Nupur Shikhare: आमिरची लेक होणार पुण्याची सून! जावईबापू पुण्याचा 'जीमकरी'

दुसरीकडे मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा जावई आहे तरी कोण, तो करतो काय असे प्रश्न नेटकऱ्यांकडून विचारले जात आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Ira - Nupur Shikhare; बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हा त्याच्या हटकेपणासाठी नेहमीच चर्चेत असतो. भलेही त्याचा लाल सिंग चढ्ढा फ्लॉप झाला असेल मात्र आता त्याच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे (aamir khan news) त्याच्या मुलीचा साखरपुडा पार पडला आहे. नुपूर शिखरे हा आता आमिरचा जावई होणार आहे. सोशल मीडियावर त्यांच्या साखरपुड्याचे फोटो (bollywood celebrity news) व्हायरल झाले असून त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ईरा आणि नुपूर यांच्या रिलेशनशिपवरुन वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते.

नुपूरनं एका वेगळ्या स्टाईलमध्ये ईराला प्रपोझ केलं. त्याची सगळीकडे चर्चा होतेय. दुसरीकडे मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा जावई आहे तरी कोण, तो करतो काय असे प्रश्न नेटकऱ्यांकडून विचारले जात आहेत. साखरपुड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांकडून कौतूकाचा वर्षाव होताना दिसतोय. कोरोनाच्या काळात नुपूर आणि ईरा यांच्यातील प्रेम प्रकरण हे जरा जास्तच चर्चेत आलं होतं. ईराला मानसिक आधार देण्यात नुपूरचा मोठा वाटा असल्याचे सांगितले जाते.

नुपूर हा एक फिटनेस ट्रेनर आहे. आता तो प्रसिद्ध सेलिब्रेटी झाला आहे. फिटनेस एक्स्पर्ट आणि कंन्सलटंट म्हणुन त्याला ओळखले जाते. बऱ्याच वर्षांपासून तो ईराचा फिटनेस ट्रेनर म्हणून काम पाहत आहे. केवळ ईरा नाही तर नुपूरनं आमिर खानला देखील फिटनेसचे धडे दिले आहे. त्यापूर्वी त्यानं दहा वर्षांपासून सुश्मिता सेनला फिटनेसचे मार्गदर्शन केले होते. 2020 मध्ये ईरानं आपल्या फिटनेसवर लक्ष केंद्रित केले होते. त्यावेळी तिचा फिटनेस ट्रेनर म्हणून नुपूरची भूमिका महत्वाची होती.

यापूर्वी नुपूर आणि ईराचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरुन व्हायरल झाले होते. त्याला मिळालेला प्रतिसादही मोठा होता. तेव्हापासून नेटकऱ्यांनी त्यांच्याविषयी चर्चा करण्यास सुरुवात केली होती. आमिर आणि किरण रावला याची कल्पना होती. त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला ते दोघेजण हजर होते.

नुपूरचा जन्म हा पुण्याचा आहे. 17 ऑक्टोबर 1985 ही त्याची जन्मतारीख आहे. एस डी कटारिया हायस्कुलमध्ये त्याचे शालेय शिक्षण झाले आहे. तर मुंबईतील आर ए पोतद्दार महाविद्यालयात त्यानं पदवीधर शिक्षण पूर्ण केले आहे. त्याची आई प्रितम शिखरे या नृत्यशिक्षिका असल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Air Pollution : पुण्यात यंदा दिवाळीला मागील वर्षी पेक्षा प्रदूषण कमी, हवेची गुणवत्ता सुधारली; नागरिकांना काही प्रमाणात दिलासा

India vs Australia 2nd ODI : रोहित शर्माला शेवटची संधी? गौतम गंभीरचा प्लॅन बी तयार; युवा खेळाडूकडून करून घेतला कसून सराव...

Kolhapur Accident : ‘मामा... असं कसं झालं हो..!, कोणावरही वेळ येऊ नये अशी कांबळे कुटुंबावर आली; भाच्याने फोडलेला टाहो काळीज फाडणारा...

CM Yogi Adityanath : 'राजकीय इस्लाम'मुळे सनातन धर्माचे सर्वात मोठे नुकसान; शिवरायांचा उल्लेख करत CM योगी म्हणाले, 'आपल्या पूर्वजांनी...'

Accident Side Story : कोल्हापूर अपघात घटना, तिघांच्या मृत्यूने गाव हळहळलं; फुलांच्या माळा, मिठाईचे डबे, दिवाळी खरेदी पिशव्या पाहून अनेकांच्या डोळ्यांत अश्रू...

SCROLL FOR NEXT