Kajol announces break from social media fans angry on her SAKAL
मनोरंजन

Kajol: नुसती नौटंकी बाकी काही नाही.. 'त्या' पोस्टवरून काजोलवर भडकले नेटकरी

एकूणच काजोलला तिच्या फॅन्सच्या टीकेचा सामना करावा लागतोय. काय झालंय नेमकं पाहूया..

Devendra Jadhav

Kajol Social Media Post News: बॉलिवूडचे कलाकार प्रमोशनसाठी काय करतील त्याचा नेम नाही. सुप्रसिद्ध अभिनेत्री काजोल हिने असाच एक प्रमोशनल स्टंट केला पण तो तिच्या अंगाशी झालाय.

नेटकऱ्यांनी काजोलला चांगलंच ट्रोल केलंय. एकूणच काजोलला तिच्या फॅन्सच्या टीकेचा सामना करावा लागतोय. काय झालंय नेमकं पाहूया..

(Kajol announces break from social media fans angry on her)

काजोलची सोशल मिडीया पोस्ट

काजोलनं तिच्या इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवर पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट शेअर करताना काजोलने लिहिले की, ती तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळाचा सामना करत आहे.

त्याचबरोबर या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने सोशल मीडियापासून ब्रेक घेत असल्याचे लिहिले आहे. तिच्या सर्व पोस्ट इंस्टाग्राम फीडमधून गायब झाल्या आहेत. काजोलच्या या पोस्टमुळे तिच्या सर्व चाहत्यांना तिची चिंता होत होती.

हा होता प्रमोशनल स्टंट

काजोलचा नवीन शो 'ट्रायल' साठी तिने हा एक प्रमोशनल स्टंट केला होता. कारण अभिनेत्रीने आता द ट्रायल नावाच्या तिच्या पहिल्या वेब सीरिजचा पहिला लूक रिलीज केला आहे.

संध्याकाळी इंस्टाग्रामवर एक नवीन पोस्ट शेअर करत काजोलने लिहिले की, 'आयुष्याची जेवढी कठीण परीक्षा, तितकेच तुम्ही मजबुत बनाल". '

१२ जून रोजी माझा कोर्टरूम ड्रामा #HotstarSpecials #TheTrial Pyaar Kanoon Dhokha चा ट्रेलर पहा.' ही पोस्ट केल्यावर सर्व इंस्टाग्राम पोस्ट आता तिच्या प्रोफाइलवर परत आल्या आहेत कारण तिने त्या केवळ प्रसिद्धीसाठी लपवल्या होत्या.

काजोलवर फॅन्स झाले नाराज:

या मार्केटिंग नौटंकीसाठी नेटिझन्स आता अभिनेत्री काजोलला ट्रोल करत आहेत. एका इंस्टाग्राम युजर्सने लिहिले की, 'सर्वप्रथम हा स्टंट अतिशय घृणास्पद आहे, किमान तुम्ही असं नाटक करण्यापूर्वी तुमच्या फॅन्सचा विचार करायला हवा होता',

तर दुसऱ्याने टिप्पणी केली, 'सर्वात वाईट! पूर्णपणे लज्जास्पद. एका यूजरने लिहिले की, 'आश्चर्यकारक! रडणारा लांडगा! पुढच्या वेळी तुमच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही." अशा कमेंट करत फॅन्सने काजोलवर नाराजी व्यक्त केलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sindhudurg tourists drowned : मोठी बातमी! सिंधुदुर्ग -शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बुडाले

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाच्या नावाबाबत मोठी अपडेट समोर! दि. बा. पाटलांचे नाव देण्यावर अखेर शिक्कामोर्तब, उद्घाटन कधी?

Nilesh Ghaiwal: "तानाजी सावंतला मध्ये का घेतोस? मी घरी येतो नाहीतर.." गुंड निलेश घायवळचा धमकीवजा फोन कॉल

Dextromethorphan Cough Syrup: राजस्थानमध्ये हे कफ सिरप ठरतंय धोकादायक! डेक्सट्रोमेथॉर्फनबद्दल जाणून घ्या महत्त्वाची माहिती

Drishyam 3 : आता येतोय दृश्यम 3 ! अजय देवगण 'या' तारखेला करणार सिनेमाची घोषणा

SCROLL FOR NEXT