Karan Johar, Kajol Instagram
मनोरंजन

Kajol: 'कभी खुशी कभी गम' सिनेमासाठी करणची पहिली पसंती काजोल नव्हतीच मुळी.. त्याच्या मनात होती भलतीच अभिनेत्री

'कभी खुशी कभी गम' सिनेमातील काजोलनं साकारलेली अंजली सर्वांचेच मन जिंकून गेली होती. तसंच,शाहरुख अन् काजोलची जोडीही भाव खाऊन गेली होती.

प्रणाली मोरे

Kajol: करण जोहर निर्मित-दिग्दर्शित 'कभी खुशी कभी गम' सिनेमानं २००१ साली बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला होता. हा फॅमिली ड्रामा पाहण्यासाठी थिएटरमध्ये कुटुंबच्या कुटुंब गर्दी करताना दिसत होती. अमिताभ बच्चन,जया बच्चन, काजोल,शाहरुख खान, हृतिक रोशन, करिना कपूर,रानी मुखर्जी अशी तगडी स्टारकास्ट सिनेमात होती तेव्हा हे तर घडणारंच होतं.

सिनेमाची कथा,गाणी अन् सगळा तामझाम पाहून त्यावेळी प्रेक्षक या सिनेमावर भाळले होते. शाहरुखनं साखरलेला राहूल, काजोलनं साकारलेली अंजली, हृतिक रोशननं साकारलेला रोहन अन् करिनानं साकारलेली पूजा उर्फ पू ..एकंदरीत रायचंद फॅमिली भाव खाऊन गेली होती. आता अनेक वर्षांनी या सिनेमाबाबतीत मोठा खुलासा झाला आहे.

करण जोहरला म्हणे काजोल त्याची बेस्ट फ्रेंड असूनही या सिनेमात नको हवी होती,त्याच्या मनात भलतीच हिरोईन होती अंजलीची भूमिका साकारण्यासाठी.

चला जाणून घेऊया काजोल आधी कोणाला मिळणार होता सिनेमा..कोण होती करणच्या मनात अन् कसं फिरलं चक्र की सिनेमा शेवटी काजोलच्याच पदरात पडला. (Kajol was not first choice of karan johar for kabhi Khushi Kabhi Gham)

करण जोहरनं आपल्या सिनेमात नेहमीच आपली खास मैत्रिण काजोलला संधी दिली अन् तिनं त्याचं सोनं केलं. करणच्या 'कभी खुशी कभी गम' सिनेमातही काजोलनं फनी आणि समंजस अंजली साकारत धमाल उडवून दिली होती. पण करणला ही भूमिका काजोलला द्यायची नव्हती..त्याच्या मनात होती ऐश्वर्या राय..त्यानं ऐश्वर्यासोबत मीटिंगही ठरवली होती.

आता करणला ऐश्वर्या सिनेमात हवी होती कारण त्याला वाटलं काजोल सिनेमाला नकार देईल, तिचंं लग्न झालंय,तिला आता कुटुंब सुरू करायचं आहे हे त्याला माहित होतं. म्हणून त्यानं तिला विचारणं टाळलं अन थेट ऐश्वर्याकडे सिनेमा नेला. पण म्हणतात ना जिसके किस्मत में जो लिखा है वो हो के रहता है...अगदी तसंच काहीसं झालं...

ऐश्वर्याला भेटायच्या एक दिवस आधी करण सहज काजोलला भेटला अन् त्यानं 'कभी खुशी कभी गम' सिनेमाविषयी तिच्याकडं विषय काढला. तेवढ्यात काजोलनं थेट विचारलं,'माझी भूमिका काय आहे? मीच करतेय हा तुझा सिनेमा..'

हे ऐकून करणची पंचाईत झाली. कारण त्यानं ऐश्वर्याला घ्यायचं ठरवलं होतं. त्याला वाटलं होतं काजोल नकार देईल..उत्साह दाखवणार नाही पण झालं उलटंच. शेवटी काजोल इन झाली अन् ऐश्वर्या आऊट..याविषयी एकदा ऐश्वर्यानं देखील एका कार्यक्रमात सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup, IND vs PAK: भारताकडून गोलचा पाऊस अन् पाकिस्तान आऊट! दणदणीत विजयासह हरमनप्रीतचा संघ पुढच्या फेरीत प्रवेश

Pune Crime: पुणं हादरलं! डोक्यात हातोडा घालून मित्रांनी काढला मित्राचा काटा; विरोधी पार्टीचं स्टेटस ठेवल्याचा राग

Marathi News Live Updates : जातनिहाय जनगणनेच्या बाबतीत अशा प्रकारची फसवणूक का केली जात आहे? - के. सी. वेणुगोपाल

Yamaha RayZR 125 ला नवा लूक! नवीन रंगांसह मिळणार TFT डिस्प्ले आणि नेव्हिगेशन स्मार्ट फीचर्सचा फूल धमाका

Jintur Rescue News: तीन वर्षांचा चिमुकला १५ फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला; दोन तासांच्या प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर

SCROLL FOR NEXT