Kangana Ranaut at Arpita Khan Eid Party Esakal
मनोरंजन

Kangana Ranaut: ज्यांना शिव्या घालते त्याच्याच पार्टीत कशी गेलीस तू? नेटकऱ्यांनी कंगनाला झापलं..

Vaishali Patil

बॉलीवूडची पंगा क्वीन म्हणुन ओळख असलेली कंगना राणौत ही नेहमी तिच्या चोख वक्तव्यांमुळे चर्चेत असते. बॉलिवूडमधील ठराविक वर्गावर टिका करण्याची संधी ती कधीही सोडत नाही.

त्यातच करण जोहरसोबतच तिचं सोशल मिडियवरील रंगलेलं शीत युद्ध हे सर्वांनाच माहित आहे. ती बॉलिवू़डमधील नेपो किड्स यांच्यावर कायम टिका करत असते. मात्र आता अलीकडेच ती याच बॉलिवूडमधील मंडळींसोबत दिसली.

त्यातच झालं असं की सलमान खानची बहीण अर्पिता खान आणि आयुष शर्मा यांनी ईद पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी बॉलीवूडशी संबंधित सर्व स्टार्स त्यांच्या घरी हजर होते.

यावेळी बॉबी देओल, हेलन, सुशीला चरक, संगीता बिजलानी, कतरिना कैफ, आमिर खान, तब्बू आदी स्टार्स दिसले याच पार्टीत कंगना रणौतही दिसली होती. कंगनाला तिथे पाहिल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

यादरम्यान कंगनाने ऑलिव्ह ग्रीन कलरचा शरारा परिधान केला होता , ज्याच्या दुपट्ट्यावर भारी काम होते. याशिवाय कंगना बाला विंटेज हेअर डूमध्ये सुंदर दिसत होती. त्याचबरोबर तिचा हेवी मेकअप तिच्या लूकमध्ये आणखी आकर्षण वाढवत आहे. तिच्या लूकची तर प्रशंसा झाली मात्र त्याचबरोबर कंगणावर जोरदार टिकाही झाली.

Kangana Ranaut

तिचे या पार्टीतले व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियावर लोकांनी कंगनावर जोरदार टीका केली. नेटकरी तिला तिच्या जून्या वक्तव्याची आठवण करून देत आहेत, ज्यामध्ये कंगनाने सलमान खानवर आणि बऱ्याच बॉलिवूड सेलिब्रिटींवर टिका केली आहे.

'कंगणा तु रोज या खानांबद्दल उलट सुलट बोलत असते मग आता त्याच्या पार्टीत कशी गेली.', 'ज्यांना रोज शिव्या देत असते त्याच्या पार्टीत जातांना काही कसं वाटतं नाही', अशा कमेंट करत नेटकऱ्यांनी कंगणाची शाळा घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT