Kangana Ranaut And Dharmendra News esakal
मनोरंजन

कंगनाच्या निशाण्यावर अभिनेता धर्मेंद्र, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

कंगनाच्या निशाण्यावर आता अभिनेता धर्मेंद्र

सकाळ डिजिटल टीम

बाॅलीवूड क्वीन कंगना रणौत बाॅलीवूड इंडस्ट्री आणि अनेक अभिनेत्यांवर नेहमी निशाणा साधत आली आहे. कंगना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. त्यावर ती आपली म्हणणे आणि मते शेअर करित असते. तसे मागील काही काळापासून कंगना अनेक बाॅलीवूड तारेतारकांवर सकारात्मक कमेंट करत आहे. दरम्यान आता कंगना रणौत (Kangana Ranaut) अभिनेता धर्मेंद्रांविषयी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. मात्र चाहते गोंधळून गेले आहेत. अखेर त्यांनी असे का केले आहे? कंगनाने धर्मेंद्र ( Actor Dharmendra) यांच्याविषयी नकारात्मक नव्हे तर सकारात्मक पोस्ट केली आहे. (Kangana Ranaut Share Dharmendra Photo And Praise Actor)

कंगनाने काय लिहिले?

कंगनाने वास्तविक इन्स्टाग्राम स्टोरीवर धर्मेंद्र यांचा जुना फोटो शेअर केला आहे. ती लिहिते, की धर्मेंद्रजी यांच्या सौंदर्यावर एक कौतुकपर पोस्ट. धर्मेंद्र काही काळापासून मोठ्या पडद्यावर दिसत नाहीत. शेवटी ते २०२० साली प्रदर्शित शिमला मिर्च चित्रपटात दिसले होते. यात त्यांच्या पत्नी हेमामालिनीही होत्या.

धर्मेंद्र यांची आगामी चित्रपटे

आता धर्मेंद्र तुम्हाला दोन चित्रपटांमध्ये दिसतील. तसेच यात पुन्हा पूर्ण देओल कुटुंब पाहायला मिळेल. सनी देओल आणि बाॅबी देओलसह धर्मेंद्र पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळतील. यावेळेस देओल कुटुंबाची तिसरी पिढी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात सनी देओलचा मुलगा करणही अभिनय करताना दिसेल. हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होऊ शकतो. या व्यतिरिक्त धर्मेंद्र 'राॅकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात दिसतील. यात रणवीर सिंह, आलिया भट, शबाना आझमी आणि जया बच्चन या मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दंड की चेष्टा? BMC अधिकाऱ्यांना हायकोर्टानं ठोठावला ११ रुपयांचा दंड, २ दिवसाची दिलीय मुदत; प्रकरण काय?

Kolhapur Prisedant : पहिल्या अध्यक्षपदासाठी भाजप आग्रही; सव्वा वर्षाचा कालावधी, महायुतीतील सर्वच घटक पक्षांना मिळणार संधी

UPI Transaction : UPI लिमिटमुळे पेमेंट फेल? जाणून घ्या कशी वाढवायची व्यवहार मर्यादा

घराबाहेर येताच ओमकार आणि आयुषमध्ये हाणामारी, नॉमिनेट का केलं? म्हणत ओमकार धावून गेला आयुषच्या अंगावर, Viral Video

8th Pay Commission च्या नावाखाली मोठी फसवणूक; चुकूनही डाउनलोड करू नका 'हे' नवीन अ‍ॅप, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा

SCROLL FOR NEXT