Kangana Ranaut Esakal
मनोरंजन

Kangana Ranaut: 'नेहमीच शांतीत क्रांती होत नसते..',कंगणाचं नवाजसाठी ट्विट..व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

सध्या बॉलिवुडमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नवाजचे वैयक्तिक आयुष्य सध्या कठीण टप्प्यातून जात आहे. ऐकीकडे त्याची माजी पत्नी आलिया ही सातत्याने त्याच्यावर गंभीर आरोप करत आहे. त्यानं तिचा मानसिक शारिरीक छळ केला इतकच नाही तर तिने नवाजवर बलात्कारासारखा गंभीर आरोपही केला आहे.

ती जवळपास दररोज सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आहे आणि त्याला दोष देत आहे. आत्तापर्यंत नवाजने यावर मौन पाळले होते, मात्र अलीकडेच त्याने एक लांबलचक पोस्ट शेअर करून अनेक खुलासे केले आहेत.

त्याने सांगितले की, तो आलिया आणि मुलांना दर महिन्याला सुमारे 10 लाख रुपये पाठवत असे.तसचं आलियाकडून जास्त पैसे उकळण्यासाठी हे सर्व करत आहे. असं त्याने सांगितलं आहे. तो म्हणाला, 'गेल्या 2 वर्षांपासून तिला सरासरी 10 लाख रुपये प्रति महिना आणि माझ्या मुलांसह दुबईला जाण्यापूर्वी 5-7 लाख रुपये दिले गेले आहेत, ज्यात शाळेची फी, वैद्यकीय, प्रवास आणि इतर गोष्टींचा समावेश आहे.

केवळ मला बॅकमेल करण्यासाठी आणि माझं नाव खराब करण्यासाठी हे सर्व ती करत असल्याचं त्यानं सांगतिलं आहे. आता या नवाजला अभिनेत्री कंगना राणौतने पाठिंबा दिला आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकीची पोस्ट शेअर करत कंगना रणौतने लिहिले की, मौन नेहमीच शांती देत ​​नाही , 'नवाजुद्दीन सिद्दीकी साहेब.. तुमचे चाहते आणि शुभचिंतक आहेत ज्यांना तुमची बाजू जाणुन घ्यायची होती.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर नवाजुद्दीन सिद्दीकी 'हड्डी' चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये तो एका ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार आहे. तो सुधीर मिश्रा दिग्दर्शित 'अफवाह' मध्ये देखील दिसणार आहे, ज्यात भूमी पेडणेकर देखील आहे.

कंगनाबद्दल बोलायचे झाले तर तिच्याकडे 'तेजस', 'इमर्जन्सी' आणि 'सीता' सारखे चित्रपट आहेत. ती 'टिकू वेड्स शेरू' बनवत आहे, ज्यात नवाजुद्दीनसोबत अवनीत कौर मुख्य भूमिकेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT