Karan Johar AMA Session  Esakal
मनोरंजन

Karan Johar AMA Session: भावा तू 'गे' आहेस का? चाहत्याने प्रश्न विचारताच करणच्या उत्तरानं केलं सर्वांना हैराण

Vaishali Patil

Karan Johar AMA Session: बॉलिवूडमध्ये करण जोहरचं नाव कायम चर्चेत असतं. बॉलिवूडच्या बड्या चित्रपट निर्मात्यांच्या यादीत त्याचा सहभाग आहे. करण हा मनोरंजन विश्वातलं खुप आघाडीच नाव आहे.

1998 मध्ये रिलीज झालेल्या 'कुछ कुछ होता है' या चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शक म्हणून करिअरची सुरुवात केली.

नुकतच करणने चित्रपटसृष्टीत प्रवेश करून 25 वर्षे पूर्ण केली आहेत. सध्या तो आलिया अन् रणवीर सिंगसोबत रॉकी और राणी की प्रेम कहानी या चित्रपटामुळे चर्चेत आले आहे.

नुकतच करणने सोशल मीडियावर आस्क मी एनीथिंग सत्र सुरु केलं होतं. या सेशनच्या माध्यमातुन त्याने अनेक विषयांवर बिनधास्त चर्चा केली आहे.

त्यांनी त्यांची ताकद आणि त्याचा विकनेस यावर चर्चा केली आहे. नेटकऱ्यांनी त्याला बरीच प्रश्न विचारली आणि त्यानेही उत्तर दिलीत.

इतर कलाकारासारखचं करण जोहरने Instagram च्या थ्रेडवर अकाउंट ओपन केलं आहे.

करण जोहरने या थ्रेडवर चाहत्यांसोबत चर्चा केली. त्याने लिहिलं की, "पुढील 10 मिनिटांसाठी मी तुमच्यासोबत आहे. तुम्ही मला कोणताही प्रश्न विचारू शकता." यावेळी करणला त्याच्या वैयक्तिक आणि व्यासायिक आयुष्याबद्दल अनेक प्रश्न विचारले.

यानंतर त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यातच एकाने करणने विचारले, "तू गे आहेस का, हो ना?" , या प्रश्नाला उत्तर देत करणने लिहिल की, "तुला माझ्यात रस आहे का?"

तर त्याला कोणत्या गोष्टीचा खेद आहे असं विचारल्यावर करणने सांगितले की, 'मला माझी आवडती अभिनेत्री श्रीदेवी मॅमसोबत काम करण्याची आणि दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली नाही.'

दुसऱ्या एका व्यक्तीने विचारले, "भविष्यात धर्मा आणि शाहरुख खान एकत्र काम करतील का?" करणने उत्तर दिले, "मला कोणतेही रहस्य विचारू नका, मी खोटे बोलणार नाही

करण जोहर सध्या त्याचा आगामी चित्रपट रॉकी आणि राणीच्या प्रेमकथेचे प्रमोशन करत आहे. या चित्रपटात त्याच्याशिवाय आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

चित्रपटात जया बच्चन आणि धर्मेंद्र यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. यात वरुण धवन, जान्हवी कपूर आणि सारा अली खान देखील छोट्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट 28 जुलै रोजी प्रदर्शित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

Plane Service : मोठी बातमी! सोलापूर ते मुंबई विमानसेवा सप्टेंबरपासून होणार सुरू; 'डीजीसीए'कडून स्टार एअरला परवानगी

Rekha Gupta Announcement: 'जनसुनावणी'वेळी झालेल्या हल्ल्यानंतर आता दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची मोठी घोषणा, म्हणाल्या...

Ajinkya Rahane नंतर कोण होणार मुंबईचा कर्णधार? श्रेयससोबत शर्यतीत ३३ वर्षीय खेळाडू; MCA कडे आहेत 'हे' तीन पर्याय

Maharashtra Latest News Update: पोलिस असल्याची बतावणी करत सेवानिवृत्त मुख्याध्यापकास लुटले

SCROLL FOR NEXT