Yash Birthday sakal
मनोरंजन

KGF Star Yash : मुलगा स्टार तरीही बाप चालवतो बस

यश कोट्यवधी रुपये कमावतो तरीही वडिलांनी कधी बस चालविण्याचा व्यवसाय सोडला नाही.

सकाळ डिजिटल टीम

कन्नड फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता यशचा आज 37 वा वाढदिवस आहे. यश ने त्याच्या KGF या बहू चर्चित चित्रपटातून चांगलीच ओळख कमावली. देशाच्या कानाकोपऱ्यात या KGF स्टार यशचे फॅन्स आहेत. यातील त्याची रॉकीभाईची भुमिका तर प्रचंड गाजली.

देशाचा एक सुपरस्टार म्हणून ओळख असलेल्या यशचे आयुष्यही तितकेच रोमांचक आहे. यश हा एका सर्वसाधारण घरातून वाढलेला मुलगा होता. त्याचं फिल्मी करिअर जितकं संघर्षमय होतं तितकचं त्यांचं वैयक्तीक आयुष्यही संघर्षामय राहलं.

केजीएफ चित्रपटातून रेकॉर्ड ब्रेक कमाई करणारा आणि देशातील सर्वाधित कमाई करणाऱ्या चित्रपटापैकी एक असलेल्या या  चित्रपटामधील यशच्या अभिनयाचं अनेकांनी मनापासून कौतुक केलं. पण तुम्हाला माहिती आहे का या स्टारचे वडिल बस चालवतात. तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरंय. यशचे वडिल आधी बस चालवायचे पण आता मुलगा स्टार झाल्यावरही ते बस चालवतात.

यश हा चित्रपटामध्ये काम करण्यासाठी कोट्यवधी मानधन घेतो मात्र मुलगा एवढं कमावतो तरीही वडिलांनी कधी बस चालविण्याचा त्यांचा व्यवसाय सोडला नाही. याविषयी स्वत: KGF चे दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी माहिती दिली होती. एसएस राजामौली म्हणाले होते की यशचे वडील हे बस चालक आहेत आणि ते आजही बस चालवतात. ते खरे स्टार आहे.

यशने नंदा गोकुला नावाच्या टीव्ही सीरियलमधून आपल्या करीअरला सुरवात केली होती. इथेच त्याची ओळख राधिका पंडीतसोबत झाली. दोघांमध्ये सुरवातीला मैत्री आणि नंतर हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. यशनं  2016 मध्ये राधिका पंडितसोबत लग्न केलं. यश आणि राधिकाला दोन मुलं असून ते नेहमी त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

ENG vs IND: १ बॉल ६ धावा अन् भारताची कर्णधार आऊट; इंग्लंडचा भारतावर शेवटच्या चेंडूवर विजय

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

SCROLL FOR NEXT