Laal Singh Chaddha: Atul Kulkarni Revealed Big Secret About Movie Script, Say,' Aamir refused...' Google
मनोरंजन

Laal Singh Chaddha:आमिर विरोधात अतुल कुलकर्णीचा सूर; म्हणाला,'मला 2 वर्ष..'

आमिर खानचा लाल सिंग चड्ढा ११ ऑगस्ट रोजी रिलीज होत आहे,पण सिनेमा वादांमुळे आधीपासूनच चर्चेत आहे.

प्रणाली मोरे

Laal Singh Chaddha: आमिर खान(Aamir Khan) आणि करिना कपूर(Kareena Kapoor) यांच्या मुख्य भूमिका असलेला लाल सिंग चड्ढा रिलीज होण्यास आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. सिनेमाचे प्रमोशनही जोरदार सुरु आहे. बॉलीवूडचा लाल सिंग चड्ढा सिनेमा हॉलीवूडचा ऑस्कर विनिंग सिनेमा 'फॉरेस्ट गम्प'चा ऑफिशियल हिंदी रीमेक आहे. या सिनेमाची पटकथा प्रसिद्ध अभिनेता अतुल कुलकर्णीनं(Atul Kulkarni) लिहिली आहे. एका मुलाखती दरम्यान अतुल कुलकर्णीनं सिनेमाच्या स्क्रीप्टविषयी मोठा खुलासा केला आहे. आमिर खाननं कसा स्क्रिप्ट संदर्भात आपल्याला त्रास दिला याविषयी अतुल स्पष्टच बोलला आहे.(Laal Singh Chaddha: Atul Kulkarni Revealed Big Secret About Movie Script, Say,' Aamir refused...')

अभिनेता अतुल कुलकर्णी भुतकाळात डोकावत म्हणाला,''फॉरेस्ट गम्पच्या अॅडाप्टेशनची सुरुवात २००८ मध्ये आमिर खान प्रॉडक्शनचा सिनेमा 'जाने तू जाने ना' च्या प्रीमियरनंतर झाली. आम्ही सगळेच त्यावेळी सिनेमाच्या प्रीमियरसाठी आमिरखान सोबत होतो. त्याच दरम्यानं आमिरच्या या ड्रीम प्रोजक्टच्या विषयावर चर्चेला सुरुवात झाली.

अतुल कुलकर्णी पुढे म्हणाला,''मी आणि आमिरनं फॉरेस्ट गम्पचं नाव घेतलं, त्यानंतर लगेचच पुढल्या दिवशी माझ्या घरी या सिनेमाची डिव्हीडी मी पाहिली. माझ्याकडे तेव्हा वेळ होता,मी लागलीच सिनेमा पाहिला. तेव्हा मी लगेच विचार करायला सुरुवात केला की, या सिनेमात जे दाखवलंय ते जर भारतात घडलं तर ते कशा पद्धतीनं दाखवलं जावं,त्याचे परिणाम कसे होतील. सिनेमा पाहताच मी याच्या पटकथेवर काम करण्याचा विचार केला''.

अतुल कुलकर्णी पुढे म्हणाला की,''मी १० दिवसांच्या आत स्क्रीप्टचे काम पूर्ण केले आणि पुढील ३ ते ४ दिवसांत मी सेकेंड ड्राफ्ट देखील पूर्ण केला. पण खरी अडचण पुढेच होती. जसं मी स्क्रिप्ट हातात घेत आमिरला संपर्क केला,तेव्हा त्यानं मला स्क्रिप्ट वाचनासाठी वेळच दिला नाही.'' अतुल म्हणाला,''आमिरनं तब्बल २ वर्ष केवळ स्क्रिप्ट वाचायला लावली. आम्ही दोघं अनेकदा एकत्र यायचो,भेटायचो. तेव्हा आमिरला विचारलं की तो म्हणायचा, हां,पढते है''.

काही वर्षानंतर मी आमिरला विचारलं की,''कधी वाचायची स्क्रिप्ट?''. त्यावर आमिर मला म्हणाला, 'तू लेखक नाहीस आणि तू मला सांगतोयस की, १५ दिवसांत तू 'फॉरेस्ट गम्प' ची स्क्रिप्ट लिहिलीस. तू माझा खूप जवळचा मित्र आहेस आणि तू खूप वाईट स्क्रिप्ट लिहिली आहेस असं बोलून मला तुला नाराज नाही करायचं'. फक्त याच कारणासाठी आमिर स्क्रिप्ट ऐकण्यास तयार नव्हता. पण माझी स्क्रिप्ट तुला आवडली नाही तरी मी नाराज होणार नाही असं म्हणत शेवटी अतुलनं आमिरला स्क्रिप्ट ऐकण्यास तयार केलं होतं''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT