Mandana Karimi On The Name Of The Filmmaker Who Cheated On Her Google
मनोरंजन

मंदाना करिमीनं घेतलं अनुराग कश्यपचं नाव; म्हणाली,'माझ्या गर्भपाताला तो...'

काही दिवसांपूर्वी मंदानानं 'लॉकअप' मध्ये प्रसिद्ध दिग्दर्शकामुळे आपण प्रेग्नेंट राहिलो होतो असं खळबळजनक वक्त्व्य केलं होतं.

प्रणाली मोरे

मंदाना करिमी(Mandana Karimi) म्हणजे कंगनाच्या (Kangana Ranut) 'लॉकअप'(Lock UPP) मध्ये नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करुन धमाका करणारी कैदी. आतापर्यंत तीनं स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यापासून ते करिअरपर्यंत सगळ्याच गोष्टींवर उलट-सुलट बरीच वक्तव्य केली आहेत. मंदाना करिमीनं 'लॉकअप' मध्ये आपला गर्भपात आणि सीक्रेट अफेअरशी संबंधित एक मोठा खळबळजनक दावा केला होता. सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा रंगली होती. तिनं मागे सांगितलं होतं की एका प्रसिद्ध दिग्दर्शकामुळे ती गर्भवती राहिली होती. पण त्यानं तिला धोका दिला अन् त्यामुळे तिला गर्भपात करावा लागला होता. त्यानंतर सोशल मीडियावर चर्चा रंगली की त्या प्रसिद्ध दिग्दर्शकाचं नाव अनुराग कश्यप(Anurag Kashyap) आहे. मंदानानं दिग्दर्शकाविषयी संकेत दिले होते,पण त्याचं नाव नव्हतं घेतलं. याव्यतिरिक्त मंदानानं २००० साली अनुराग कश्यपच्या समर्थनार्थ एक ट्वीट केलं होतं,जे तेव्हा पुन्हा व्हायरल झालं. त्यामुळे अनुराग कश्यपच्या नावाची दाट शंका येऊ लागली.

'लॉकअप' मध्ये मंदानाच्या या सीक्रेटमुळे कंगना रणौत देखील भावूक झाली होती. मंदाना म्हणाली होती की, जेव्हा तिचा घटस्फोट होत होता त्यावेळी तिचे एका प्रसिद्ध दिग्दर्शकाशी अफेअर सुरु होतं. तेव्हा मंदाना वाटलं होतं की हा दिग्दर्शक महिलांच्या अधिकासाठी बोलताना दिसतो, खूप लोकांसाठी एक आदर्श आहे,आणि हेच कारण होतं की ती त्याच्या प्रेमात पडली होती. तिनं सांगितलं की त्यांनी दोघांनी आपल्याला बाळ हवं म्हणून प्रेग्नेंसी प्लॅन केली होती. पण जेव्हा मंदाना गर्भवती राहिली तेव्हा तो दिग्दर्शक म्हणाला की,'तो यासाठी तयार नाही',आणि त्यानं तिला सोडून दिलं. मंदानाचं हे वक्तव्य ऐकल्यानंतर लोकांनी या प्रकरणाचा थेट संबंध लावला तो प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपशी.

एका नेटकऱ्यानं लिहिलं होतं, 'मला तो दिग्दर्शक कोण आहे हे माहित नाही पण मंदानासोबत जे झालं ते खूप भयानक घडलं'. तर दुसऱ्या एका नेटकऱ्यानं यावर म्हटलं की,'तो दिग्दर्शक अनुराग कश्यपच असणार'. यावर आता अनुराग कश्यपचं नाव घेऊन मंदानानं मोठा खुलासा केला आहे. काय म्हणाली आहे नेमकं मंदाना अनुराग कश्यपविषयी?

मंदाना म्हणाली,''मी कुठेच दिग्दर्शकाचं नाव घेतलं नाही. लोकं उगाच अनुराग कश्यपचं नाव मध्ये घेत आहेत. अनुराग माझा चांगला मित्र होता आणि अजूनही आहे. मी बातम्या पाहिल्या. पण हे योग्य नाही झालं. याप्रकरणात अनुरागला का ओढलं गेलं. कोणाचंही नाव कुठल्याही प्रकरणात गोवून त्याची हेडलाईन करणं हे योग्य नाही. किंवा कोणाच्याही तोंडी मुद्दामहून एखादं नाव देणं हे मला पटलेलं नाही. मी अनुराग कश्यपनं मला फसवलं असं कुठेच म्हटलं नव्हतं''. असो,आता मंदानानं स्पष्टिकरण दिल्यावर अनुराग कश्यपनं तिला फसवलं नाही हे तर कळलं पण मग तो दुसरा प्रसिद्ध दिग्दर्शक कोण या विषयी पुन्हा चर्चा रंगू लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhanorkar Join BJP: रविंद्र चव्हाणांचा विराट शो! धानोरकरांचा भाजपात प्रवेश, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचा किल्ला कोसळला

मोदी सरकारचा मोठा निर्णय! Asia Cup 2025 स्पर्धेतील India vs Pakistan लढत होणार की नाही? फैसला झाला

‘धुरंधर’च्या टीमची तब्येत बिघडण्याचं खरं कारण समोर; सेटवरील जेवण नाही तर लेहमध्ये पसरलेलं मोठं फूड कंटॅमिनेशन

Stock Market Closing: शेअर बाजार वाढीसह बंद; सलग सहाव्या दिवशी तेजी, कोणते शेअर्स चमकले?

Bail Pola 2025: डिजेपासून बैलांना त्रास! शेतकऱ्यांना ‘ॲनिमल राहत’कडून १० सूचना

SCROLL FOR NEXT