Allu Arjun Love story Sakal
मनोरंजन

लग्न करेन तर हिच्याशीच! सुपरस्टार अल्लू अर्जुनची रंजक लव्हस्टोरी

Lovestory of Allu Arjun : सुपरस्टार असूनही अल्लू अर्जुनला लग्न करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. आपलं स्टारडम त्याने कधीचं प्रेमापेक्षा मोठं समजले नाही.

सकाळ डिजिटल टीम

अल्लू अर्जुनची रंजक लव्हस्टोरी (Lovestory of Allu Arjun):

Valentine Week 2022 : अल्लू अर्जुनचा पुष्पा (Pushpa Movie) हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. कोरोनामध्येही या चित्रपटांनी बक्कळ कमाई केली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) दमदार अभिनय पुन्हा एकदा प्रेक्षकांना पहायला मिळाला. पुष्पा चित्रपट फक्त चित्रपटगृहांमध्येच नाही, तर सोशल मीडियावरही धुमाकूळ घालतोय. या चित्रपटांशी संबंधित दृश्ये आणि गाण्यांवर अनेक रिल्स सध्या व्हायरल होताना दिसत आहेत. कार्यक्रमांदरम्यानही पुष्पामधील गाणी वाजताना दिसत आहेत. एकंदरीतच पुष्पाच्या निमित्ताने देशभरातून अल्लू अर्जुन आणि टिमवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

दमदार अभिनय, उत्कृष्ट डान्स तसेच स्टायलिश लुक यामुळे अल्लू अर्जुनचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. तेलगू दिग्दर्शक अल्लू अरविंद यांचा मुलगा आणि प्रसिद्ध अभिनेते चिरंजीवी यांचा भाचा असलेल्या अल्लू अर्जुनची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. अल्लू अर्जुन आणि त्याची पत्नी स्नेहा रेड्डी (Sneha Reddi) या दोघांच्या संसाराला आता 11 वर्षे झाली आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांची प्रेमकहाणी (Lovestory) चांगलीच गाजली होती. आज जाणून घेऊया त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल....

मित्राच्या लग्नाला गेला होता अल्लू अर्जुन, आणि तिथे ती दिसली...

अल्लू अर्जुन काही वर्षांपूर्वी एका मित्राच्या लग्नात गेला होता. तिथे अचानक त्याचं लक्ष एका देखण्या, उंच पुऱ्या अशा स्नेहाकडे गेलं. अल्लू पाहता क्षणी तिच्या प्रेमात पडला. विशेष गोष्ट म्हणजे स्नेहालासुद्धा तो आवडला होता. झालं....दोघांनीही कसेतरी एकमेकांचे नंबर मिळवले आणि त्यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात झाली.

खरंतर त्यावेळी स्नेहा भारतात राहत नव्हती. ती शिक्षणासाठी परदेशात होती. अल्लूही त्यावेळी फारसा प्रसिद्ध नव्हता. परंतु तरीही त्यांच्यातले नातं अजून वाढत होतं. तरीही त्यांच्यातलं प्रेम मात्र वाढत गेले. काही काळानंतर स्नेहा मास्टर्स पुर्ण करून मायदेशी परतली. दरम्यान अल्लु अर्जुनही तेलगु इंडस्ट्रीमध्ये बऱ्यापैकी स्थिरावला होता. त्याचं नाव झालं होते. पैसा, प्रसिद्धी कशाचीच कमी नव्हती.

शाकालची इंट्री...

या दोघांची लव्हस्टोरी कितीही बहरली तरी त्यांच्या नात्यातही शाकाल होता. दोघांनी लग्न करायचा निर्णय घेतला, अल्लु अर्जुनच्या पालकांनी त्याला परवानगी दिल्ली पण इकडे स्नेहाचे कुटूंबीय काही केल्या तयार होईनात. त्यांनी अल्लु अर्जुनला जावई म्हणून स्विकारण्यास थेट नकार दिला. आता खरं कहाणीत ट्विस्ट आला होता. अल्लु अर्जुन आणि स्नेहाच्या कुंडलीमध्ये शाकालची अधिकृत इंट्री झाली होती. पडद्यावरच्या रोमँटिक हिरोच्या आयुष्य वेगळ्याच वळणावर उभं होतं. पण हार मानेल तो अल्लु अर्जुन कसला...

त्यानंही ठरवलं काहीही झालं तर हिच्याशीच लग्न करेन...

त्यानं काम करत करत स्नेहाच्या घरी हेलपाटे मारणं चालूच ठेवलं. स्नेहावर आपला किती जीव आहे आणि तिला खुश ठेवण्यासाठी तो काय करेल हे तो तिच्या कुटूंबीयांना समजवायचं प्रयत्न करत असे. स्नेहावरचं अल्लुचं प्रेम पाहून शेवटी तिचे कुटूंबीय तयार झाले. त्याच्या प्रयत्नांना यश आले. आणि 6 मार्च 2011 साली या दोघांनी थाटामाटात लग्न लावून दिले.

अल्लु अर्जुनचं करिअर यशाच्या शिखरावर पोहोचलं. अनेक सुंदर हिरोइन्ससोबत त्यानं काम केलं. पण तरीही त्याचे स्नेहावरचं प्रेम मात्र कमी झाले नाही. त्याच्या सर्व यशाचं श्रेय तो स्नेहालाच देतो. या दांपत्याच्या लग्नाला आता 11 वर्षे पुर्ण होतील. सध्या या दोघांना आर्यन आणि अरहा ही दोन मुलं आहेत. इकडे बॉलिवूडमधील अनेक कलाकारांची लग्न टिकत नसताना हे दांपत्य माक्ष खऱ्या अर्थाने तरूणांसाठी आदर्श आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dindori Accident : मोटारसायकलला धडकताच नाल्यात कोसळली कार, बालकासह 7 जणांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Dnyaneshwari Munde: परळीच्या बंगल्यावरुन कॉल आला अन्... ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप! 18 महिन्यात 8 तपास अधिकारी बदलले, आरोपी मोकाट

'लग्न करणं गरजेचं आहे का?' प्राजक्ता माळीने विचारला होता गुरुंना प्रश्न

Latest Marathi News Updates : पुण्यात आज अनेक ठिकाणी पाणीपुरवठा बंद

Samosa Health Risks: समोसा आरोग्यासाठी हानिकारक का आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT