Tollywood Actor Mahesh babu esakal
मनोरंजन

Mahesh Babu: 'बॉलीवूडमध्ये' का काम करु? अभिनेत्यानं सांगितलं कारण

सध्याच्या घडीला बॉलीवूड आणि टॉलीवूडमध्ये मोठी स्पर्धा (Bollywood news) असल्याचे दिसून आले आहे.

युगंधर ताजणे

Tollywood News: सध्याच्या घडीला बॉलीवूड आणि टॉलीवूडमध्ये मोठी स्पर्धा (Bollywood news) असल्याचे दिसून आले आहे. प्रसिद्ध अभिनेता सलमान खाननं (Bollywood Actor salman khan) टॉलीवूडच्या वाढत्या यशाबद्दल बॉलीवूडमधील चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक यांना आव्हान असल्याचे सांगितले होते. बॉलीवूडला आणखी हिरोइझम (Bollywood celebrity) टाईप चित्रपट तयार करावे लागतील. असं त्यानं सांगताना बॉलीवूडमध्ये कथानक आणि हिरोइझम यांची कमतरता असल्यानं प्रेक्षक त्याकडे पाठ फिरवताना दिसत आहे. गेल्या काही (Allu Arujun pushpa) महिन्यांपासून बॉलीवूड बिग हिट चित्रपटाच्या शोधात आहे. अल्लु अर्जुनचा पुप्षा, अजित यांचा वल्लमाई, धनुषचा अथिरन, जय भीम, त्यानंतर प्रभासचा राधे शाम आणि आता राजामौली यांचा आरआरआर (RRR Movie) या चित्रपटांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

टॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता महेश बाबु हा त्याच्या एका प्रतिक्रियेमुळे चर्चेत आला आहे. त्यामध्ये त्यानं आपल्याला बॉलीवूडमधील चित्रपटांमध्ये काम करण्याची काही गरज नसल्याचे सांगितलं आहे. दुसरीकडे टॉलीवूडमधील अनेक अभिनेते आता हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्यास उत्सुक असल्याचे सांगण्यात येत आहे. अल्लु अर्जुन हा संजय लीला भन्साळींच्या एका चित्रपटातून समोर येण्याची शक्यता आहे. यासगळ्यात सुपरस्टार महेश बाबुनं बॉलीवूडमध्ये डेब्यु करण्यावर दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. त्यानं आपल्याला सध्यातरी बॉलीवूडमध्ये काम करण्याची काही गरज नसल्याचे सांगितले आहे.

महेश म्हणतो, मला बॉलीवूडमध्ये येण्यात काहीच रस नाही. हैद्राबादमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये महेश बाबुनं बॉलीवूड इंट्रीवर प्रतिक्रिया दिली आहे. मी सध्या तेलुगू चित्रपटांमध्ये काम करतो. आणि माझे हे चित्रपट जगभर सगळीकडे पाहिले जात आहेत. त्यामुळे मला तरी बॉलीवूडमध्ये काम करण्याची काही गरज नाही. मी माझ्या भाषेतील चित्रपट करण्यास कटिबद्ध असल्याचे त्यानं सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांपासून महेश बाबु बॉलीवूडमध्ये येणार असल्याच्या गोष्टींना सोशल मीडियावर उधाण आले होते. मात्र आता त्यानं दिलेल्या प्रतिक्रियेनं त्याला ट्रोल करणाऱ्यांची तोंडं गप्प झाली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Highway traffic jam : मुंबई-पुणे हायवेवर ट्रॅफिक जॅम, सुप्रिया सुळे तब्बल दोन तास अडकल्या; व्हिडिओद्वारे प्रवाशांनी साधला संवाद

आधी आक्रमक सेंडऑफ अन् नंतर विराट-गिलचा ब्रोमान्स.... GT vs RCB सामन्यानंतरचा Video Viral

Latest Marathi News Live Update : महाकालेश्वर मंदिर परिसराच्या जवळ सुरू असलेल्या उत्खनन कामादरम्यान विशाल शिवलिंग सापडले

Chandrapur: अर्पिताच्या संशयास्पद निधनची चौकशी करा; कुटुंबीयांची मागणी; जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन

Bank Holiday: मे महिन्यात 12 दिवस बँका बंद! RBI ची अपडेट; व्यवहाराआधी पाहा सुट्ट्यांची यादी

SCROLL FOR NEXT