Manipur Violence Urfi Javed Angry Words esakal
मनोरंजन

Urfi Javed : 'तुम्हाला लाज कशी वाटत नाही? फक्त मणिपूरच नाही तर...'!

मणिपूरमध्ये त्या महिलांसोबत झालेल्या प्रकारचे देशभर तीव्र पडसाद उमटल्याचे दिसून आले आहे. सोशल मीडियावर मणिपूर हा ट्रेडिंगचा विषय आहे.

युगंधर ताजणे

Manipur Violence Urfi Javed Angry Words : देशभरामध्ये मणिपूरच्या घटनेनं अनेकांना निरुत्तर केलं आहे. केंद्रीय पातळीवरुन या घटनेची आता गंभीरपणे दखल घेण्यात आली आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये होणाऱ्या हिंसाचारानं सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. मणिपूरमधील दोन महिलांवर झालेल्या सामुहिक अत्याचारानं तर अमानुषपणाची पातळी गाठली आहे.

यासगळ्या घटनेवर देशभरातून तीव्रपणे संताप व्यक्त केला जात आहे. नेटकरी सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारला जाब विचारत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सुरु असणाऱ्या या घटनेकडे केंद्र सरकार लक्ष का देत नाही, हा प्रश्न अजूनही का सुटत नाही, प्रशासन काय करते आहे अशा प्रकारचे उपस्थित केले जात आहे. यासगळ्यात बॉलीवूडमधील सेलिब्रेटींनी देखील आता या घटनेवर आगपाखड केली आहे. तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारनं महिलांवरील अत्याचाराबाबत त्याच्या ट्विटमधून राग व्यक्त केला आहे. तो म्हणतो, ज्यानं कुणी हे काम केलं आहे त्याला कडक शासन व्हायला हवे. गांभीर्यानं या घटनेची दखल घ्यायला हवी. यानंतर अभिनेत्री मीरा चोप्रानं देखील मणिपूरमध्ये होणाऱ्या घटनेची दखल घेऊन त्यावर कार्यवाही केली पाहिजे. दोषींना शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.

यासगळ्यात टीव्ही मनोरंजन विश्वातील अभिनेत्री उर्फीची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यात तिनं तिच्या आक्रमक स्वभावाला साजेशी अशी पोस्ट इंस्टावर लिहिली आहे. ती म्हणते, आपल्याला जो प्रकार होतो आहे याची लाज वाटायला हवी. जे काही होते आहे ते केवळ मणिपूरसाठी नव्हे तर पूर्ण भारतासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे. अशा शब्दांत उर्फीनं तिची भावना व्यक्त केली आहे.

मणिपूरमध्ये त्या महिलांसोबत झालेल्या प्रकारचे देशभर तीव्र पडसाद उमटल्याचे दिसून आले आहे. सोशल मीडियावर मणिपूर हा ट्रेडिंगचा विषय आहे. दोन समुहामध्ये गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरु असून त्यात काही निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सध्या मणिपूरमधील वातावरण प्रचंड अशांत अशांत असून तिथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : अमित ठाकरे सपत्नीक वरळी डोममध्ये पोहचले; राज अन् उद्धव ठाकरेही रवाना

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

SCROLL FOR NEXT