Amey Wagh esakal
मनोरंजन

'पाठीमागे वाईट बोलणारे जे आहेत, त्यांना आरसा!,' अमेयची बोलकी पोस्ट

मराठीतील प्रसिद्ध अभिनेता अमेय वाघ (Amey Wagh) हा त्याच्या हटके अभिनयासाठी जसा प्रसिद्ध आहे तसा तो त्याच्या परखड (Marathi Entertainment) प्रतिक्रियेसाठी देखील ओळखला जातो.

युगंधर ताजणे

Marathi Movies: मराठीतील प्रसिद्ध अभिनेता अमेय वाघ (Amey Wagh) हा त्याच्या हटके अभिनयासाठी जसा प्रसिद्ध आहे तसा तो त्याच्या परखड (Marathi Entertainment) प्रतिक्रियेसाठी देखील ओळखला जातो. काही दिवसांपूर्वी त्याचा झोंबिवली (zombivli) नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. आता प्रेक्षकांनी या चित्रपटाचा दुसरा भाग कधी येणार अशी विचारणा कलाकारांना सुरु केली आहे. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित झोंबिवलीला प्रेक्षकांची मोठी दाद मिळाली आहे. नाटक, सिनेमा आणि वेब सीरिजमधून प्रेक्षकांची पसंती मिळवणाऱ्या अमेयनं सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल केली आहे. त्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

एखाद्या कारणावरुन ट्रोल होणं हे काही कलाकारांसाठी नवीन गोष्ट नाही. हल्ली सोशल मीडियावर तर कोणत्याही कारणावरुन कलाकारांना ट्रोल केले जाते. त्यामुळे कलाकारांना मोठ्या मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत असल्याचे दिसुन आले आहे. नेटकऱ्यांना एखाद्या कलाकाराचा अंदाज आवडला नाही तर लागलीच त्याच्याविरोधात सोशल मीडीयावर पोस्ट करुन व्यक्त व्हायचं हा सध्या ट्रेंड आहे. कित्येक सेलिब्रेटींना त्याचा फटका बसतो. अमेयनं शेयर केलेली पोस्ट त्यानं मोठ्या सुचक अर्थानं लिहिली आहे. आपल्यावर टीका करणाऱ्यांना तर अमेयनं असं टोमण्यातून उत्तर दिलं आहे अशी चर्चा रंगली आहे. त्यानं आरशासमोर फोटो काढून तो पोस्ट केला आहे. आणि त्याला एक भन्नाट कॅप्शन लिहिली आहे.

अमेयची ती कॅप्शन म्हणजे, माझ्या पाठीमागे वाईट बोलणारे जे आहेत…. त्यांना आरसा!, त्या बोलक्या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यावर त्याला कित्येकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अमेयची द ग्रेट इंडियन मर्डर नावाची सीरिज प्रदर्शित झाली होती. त्यामध्ये त्याच्या भूमिकेचं प्रेक्षकांनी कौतूक केलं होतं. त्यात त्यानं एका पत्रकाराची भूमिका केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra political news : ‘राष्ट्रवादी’च्या विलीनीकरणाला खो! दिल्लीतील दोन मोठ्या नेत्यांच्या सल्ल्यानंतरच निर्णय

Indian Cricketer Abroad: मराठमोळा अष्टपैलू जपानच्या क्रिकेट विश्‍वात चमकतोय; आदित्य फडकेची मातृभूमी भेट, बालपणीच्या आठवणींना उजाळा!

Latest Marathi News Live Update : केंद्र सरकारच्या धोरणांच्या निषेधार्थ कामगार संघटनांचा आज 'भारत बंद'; देशव्यापी बंदमुळे जनजीवनावर परिणाम होणार!

PDCC Bank Recruitment : ‘पीडीसीसी’ बँक भरतीत गोंधळ; जाहिरात प्रसिद्ध होऊन साडेचार वर्षे पूर्ण, मात्र प्रक्रिया अपूर्ण

Rohit Sharma: 'मला ती ट्रॉफी हवीच आहे, त्यामुळे....' २०२७ वनडे World Cup बाबत रोहित अखेर थेट अन् स्पष्टच बोलला

SCROLL FOR NEXT