Nora Fatehi Says “Which Blue Film Is This?” Failing To Identify Ranbir Kapoor’s Iconic Dance step Esakal
मनोरंजन

'रणबीर कपूरनं ब्लू फिल्ममध्ये काम केलंय का?', नोरा फतेहीला का पडला हा प्रश्न?

ग्लॅमरस नोरा फतेही आपल्या ग्लॅमरस पर्सनॅलिटीमुळे आणि डान्स स्टेप्समुळे भलतीच प्रसिद्ध झाली आहे.

प्रणाली मोरे

रणबीर कपूरच्या(Ranbir Kapoor) एका सिनेमातील डान्स पाहून नोरा फतेहीनं(Nora Fatehi) चक्क त्याच्या सिनेमांची तुलना ब्लू फिल्मशी केली आहे. आता आपल्या सगळ्यांच्याच मनात प्रश्न आला असेल असं नोरानं काय पाहिलं रणबीरच्या सिनेमात की लागलीच अशी शॉकिंग कमेंट करुन टाकली. चला जाणून घेऊया सविस्तर.(Nora Fatehi Says “Which Blue Film Is This?” Failing To Identify Ranbir Kapoor’s Iconic Dance step)

रणबीर कपूरचा डेब्यू सिनेमा 'सांवरिया' मधील त्याचा आयकॉनिक टॉवेल डान्स कोणी पाहिला नसेल? हे गाणं खूपच प्रसिद्ध झालं. या टॉवेल डान्स स्टेपच्या कारणामुळे सुरुवातीला रणबीरला खूप नोटीस केलं गेलं. पण आता नोरा फतेहीनं मात्र अगदी याच्या उलट केलं आहे. एकतर तिला ही रणबीरची टॉवेल डान्स स्टेप माहितच नव्हती. बरं एवढंच नाही तिनं यापुढे एक स्टेप जाऊन जे केलं ते शॉकिंगच.

ग्लॅमरस नोरा फतेही रणबीरच्या या आयकॉनिक स्टेपपासून अनभिज्ञ होती. तेव्हाच तिनं ही एकदम शॉकिंग रिअॅक्शन आणि कमेंट केली. तिनं चक्क या प्रसिद्ध गाण्याची तुलना ब्लू सिनेमाशी केली. त्याचं झालं असं की, नोरा बॉलीवूड बबल सोबत एक फन सेशन Heads Up खेळली, जिथे नोराला प्रसिद्ध कलाकारांच्या डान्स मूव्हवरनं त्यांचे गाणे आणि नाव ओळखायचे होते. नोराला एके ठिकाणी रणबीरच्या डान्स मूव्हजना ओळखायचं होतं. तिच्यासमोर रणबीर कपूरच्या 'सांवरिया' सिनेमातील टॉवेल डान्सच्या स्टेप्सची हिंट दिली गेली. पण नोरा ना गाणं ओळखू शकली, ना त्यातील अभिनेत्याला.

टॉवेल सीन रीक्रिएट झाल्यावर तो पाहून नोराला धक्काच पोहोचला,तिने विचारले- 'अच्छा तो पुरुष अभिनेता आहे, त्याने आपला टॉवेल सोडला. हा ब्लू सिनेमा आहे का ?' असं बोलून ती हसायला लागते. माझ्यासोबत हा कोणता गेम खेळला जातोय असं देखील ती म्हणाली. त्यानंतर नोराला जेव्हा 'जवानी है दिवानी' सिनेमातील 'बलम पिचकारी' गाण्यातील हुक स्टेप दाखवली गेली तेव्हा तिनं रणबीरचं नाव बरोबर घेतलं. नंतर नोरा म्हणाली,''रणबीरने कोणती ब्लू फिल्म केली आहे?''

नोरा फतेहीसोबत खेळला गेलेला तो सेशन खूपच मजेदार होता. नोरा फतेही सिनेमात आणि टी.व्ही वर आपल्या सौंदर्यानं आणि डान्सनं चाहत्यांमध्ये चर्चेत आलेली आहे. ती डान्स शो चं देखील परिक्षण करत आहे. तिच्या म्युझिक व्हिडीओवर चाहत्यांचे पाय थिरकले नाहीत तर नवलच. नोरा आपल्या ग्लॅमरस पर्सनॅलिटीमुळे आणि डान्स मुव्हजमुळे भलतीच प्रसिद्ध झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

Pune Crime : अल्पवयीन नातीवर लैंगिक अत्याचार; आजोबाला जन्मठेप

Mumbai Metro Viral News: मुंबई मेट्रोत मांजरीला लागली 'नोकरी'! MMMOCL ने दिलं Chief Feline Officer पद, ड्युटीही ठरवली

Hospital Fire Audit : आरोग्य विभागाचे वरातीमागून घोडे; अमरावती दुर्घटनेनंतर राज्यातील रुग्णालयांचे फायर ऑडिट

Marathi News Updates : राज्यासह देशात आज कुठे काय घडलं? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT