Pathaan Esakal
मनोरंजन

Pathaan Movie Release: पठाण जोमात बॉयकॉट गँग कोमात! शाहरुखच्या एन्ट्रीन थिएटर झिंगाट..

शाहरुख खान आणि त्याच्या 'पठाण' चित्रपटासाठी चाहते ट्विटरवर प्रतिक्रिया देत आहे.

Vaishali Patil

Pathaan: बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानचे चाहते ज्या क्षणाचे वाट पहात होते. तो आज आला आहे. ' पठाण' चित्रपटाद्वारे 4 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर परतत आहे . त्याच्या कमबॅक चित्रपटाची क्रेझ त्याच्या चाहत्यांमध्ये दिसून येत असून या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई केली आहे.

'पठाण' या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत गेल्या वर्षी रिलीज झालेल्या 'ब्रह्मास्त्र'चा विक्रम तर मोडलाच पण 'KGF 2'ला टक्कर दिली. या चित्रपटाबाबत ट्विटरवर लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया येत आहेत. पहिल्या दिवशीचा पहिला शो पाहण्यासाठी सकाळपासूनच चित्रपटगृहांबाहेर गर्दी उसळली आहे. शाहरुख खान आणि त्याच्या 'पठाण' चित्रपटासाठी चाहते ट्विटरवर प्रतिक्रिया देत आहे.

तरण आदर्शने ट्विटरवर सांगितले आहे की, शाहरुखचा चित्रपट देशभरातील 5200 स्क्रीन्सवर प्रदर्शित होत आहे, जो हिंदी तमिळ आणि तेलगू या तिन्ही भाषांमध्ये आहे. तो जगभरातील 2500 स्क्रीनवर येत आहे. म्हणजेच जगभरात हा चित्रपट 7700 स्क्रीन्सवर प्रदर्शित होत आहे.

चित्रपट पाहणाऱ्या चाहत्यांनी ट्विटरवरही पोस्ट टाकायला सुरवात केली आहे. 'पठाण मध्यांतरापर्यंत एक सरप्राईज आहे, वेगवान, हाय व्होल्टेज अॅक्शन. शाहरुख खानच्या इंट्रो सीनने थिएटरला स्टेडियम बनवले आहे.'

चित्रपटाच्या पहिल्या शोबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे, त्याची झलकही लोकांनी ट्विटरवर शेअर केली आहे. मुंबईत सकाळी ७ वाजताच्या 'पठाण' शोची अवस्था पाहून बॉयकॉट गँग कोमात गेल्याचा व्हिडिओ एका चाहत्याने शेअर केला आहे.

कहर म्हणजे तर काही चाहते मॉर्निंग शो पाहण्यासाठी थिएटरबाहेरच झोपले होते, हे दृश्यही सोशल मीडियावर दाखवण्यात आले आहे.

या चित्रपटात किंग खान अॅक्शन अवतारात दिसत असल्याने चाहते या चित्रपटासाठी खूप उत्सुक होतेच, त्याचबरोबर दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Passport Ranking : भारतीय 'पासपोर्ट रँकिंग'मध्ये मोठी सुधारणा!, आता ५६ देशांमध्ये 'Visa-Free' एन्ट्री करता येणार

USA vs NED : अमेरिकेच्या विजयात पुणे, मुंबईचे खेळाडू चमकले; नेदरलँड्सचा पराभव पाकिस्तानच्या पथ्यावर, अ गटाचे चित्र स्पष्ट

अभ्यास करा..! पाचवी अन्‌ आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा २२ फेब्रुवारीला; परीक्षेत दोन पेपर, १५० गुणांचा वस्तुनिष्ठ प्रश्न, वाचा...

DGCA Action on Air India : 'एअर इंडिया'ला मोठा झटका!, 'डीजीसीए'ने ठोठावला १ कोटी रुपयांचा दंड

‘एक्साईज’ची मोठी कारवाई! बनावट विदेशी दारू विकणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद! म्होरक्या बीड जिल्ह्यातील ‘या’ गावचा; लातूर, सोलापूरचेही कनेक्शन, वाचा...

SCROLL FOR NEXT