PM Narendra Modi Cannes Film Festival 2022
PM Narendra Modi Cannes Film Festival 2022  esakal
मनोरंजन

Cannes 2022: कान्समध्ये भारताला 'मान', मोदींनी सांगितलं आता उंचावली 'शान'

युगंधर ताजणे

Cannes 2022: जगभरातील चित्रपट रसिकांसाठी, प्रेक्षकांसाठी आनंदाची पर्वणी असणारा फिल्म फेस्टिव्हल म्हणजे कान्स महोत्सव. गेल्या काही वर्षांपासून या (PM Narendra Modi) महोत्वावर कोरोनाचं सावट होतं. त्यामुळे त्याला म्हणावा असा प्रतिसाद काही मिळाला नाही. यंदाच्या महोत्सवाचे वेगळेपण लक्ष वेधून (Bollywood News) घेणारे आहे. त्याचे कारण भारताला त्यात मिळालेलं प्रतिनिधीत्व. काही दिवसांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फ्रान्सच्या (Narendra Modi Cannes 2022 ) दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी फ्रान्सच्या सांस्कृतिक मंत्र्यांशी केलेली बातचीत भारतीय चित्रपट व्यवसायासाठी महत्वाची होती. भारत आणि फ्रान्स यांच्यातील सांस्कृतिक संबंध हे आणखी दृढ व्हावेत म्हणून मोदींनी हा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. आता कान्समध्ये भारताचा प्रभाव ठळकपणे जाणवणारा आहे.

2022 च्या कान्स चित्रपट महोत्सवाला आता सुरुवात झाली आहे. पहिल्यांदाच भारत यंदाच्या महोत्सवामध्ये कंट्री ऑफ ऑनर च्या रुपानं सहभागी झाल्याचे दिसून आले आहे. त्या फेस्टिव्हलमध्ये एका वेगळ्या भूमिकेत जाण्याची संधी भारताला मिळाली आहे. त्यानिमित्तानं मोदींची भूमिका महत्वाची असल्याचे म्हटले जात आहे. त्यांनी केलेल्या मध्यस्थीनं हा मान भारताला मिळाल्याचे राजकीय पटलावरील अनेक नेते म्हणत आहे. यासगळ्यात मोदींनी आपल्या भाषणातून कान्सच्या निमित्तानं भारताला पुन्हा एकदा शुभेच्छा दिल्या आहे. तसेच त्यातील भारताच्या सहभागाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. मोदी म्हणाले, कान्समध्ये आपल्याला मिळालेली संधी ही विशेष आहे. त्यातून भारत आणि फ्रान्स यांच्यातील सांस्कृतिक संबंध दृढ होणार आहे.

कान्सच्या 2022 च्या महोत्सवामध्ये माहिती आणि सुचना प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ कान्समध्ये सहभागी होणार आहे. तत्पूर्वी मोदींनी कान्सला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामध्ये ते म्हणतात. फ्रान्स सरकारनं भारताला दिलेली संधी ही मोटी गोष्ट आहे. याशिवाय भारत देशासाठी देखील ही आनंदाची बाब आहे. आता आपले चित्रपट पुन्हा एका वेगळ्या नव्या प्लॅटफॉर्मवर येणार आहे. त्याला मिळणारा प्रेक्षकवर्ग हा जागतिक पातळीवरील आहे. कान्समध्ये त्या चित्रपटांची चर्चा होईल. त्यावर संवाद होईल. हे माध्यम आणखी वेगवेगळ्या लोकांपर्यत जाईल. त्यातून विचारमंथन झाल्यास ती समाधानाची बाब म्हणावी लागेल. अशा प्रकारची प्रतिक्रिया मोदींनी यावेळी दिली आहे. भारत सध्या स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण करत असताना फ्रान्स सोबतच्या राजकीय मैत्रीपूर्ण संबंधांची देखील 75 वर्षे पूर्ण करत आहे. असेही मोदींनी सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Vishal Patil: "विशाल पाटील भाजपची बी टीम," चंद्रहार पाटलांचा सनसणीत आरोप; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सांगलीचा पार चढणार

Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सन कर्करोगाचे खटले निकाली काढणार; कंपनी देणार 6.5 अब्ज डॉलर्सची भरपाई

Latest Marathi News Live Update : ठाकरे गटाच्या जाहिरातीत पॉर्न स्टार- चित्रा वाघ

SCROLL FOR NEXT