R Madhavan- Alia Bhatt and Kartik Aaryan in RHTDM remake
R Madhavan- Alia Bhatt and Kartik Aaryan in RHTDM remake Google
मनोरंजन

रहना है तरे दिल में: Remake मध्ये कार्तिक आणि आलिया? आर माधवन स्पष्टच बोलला

प्रणाली मोरे

आर माधवन(R Madhavan) सध्या त्याच्या 'रॉकेट्रीः द नांबी इफेक्ट'(Rocketry- The Nambi Effect) सिनेमाच्या प्रमेशनमध्ये भलताच बिझी आहे. याच सिनेमाच्या प्रमोशनल कार्यक्रमा दरम्यान माधवनने आपल्या गाजलेल्या 'रहना है तेरे दिल में'(Rehnaa Hai Terre Dil Mein) च्या प्रोजेक्टविषयी मोठं भाष्य केलं आहे. यावेळी त्यानं सिनेमातील संभाव्य कलाकारांची नावं देखील जाहिररित्या बोलून दाखवली आहेत.

एका वेबसाईटशी बोलताना आर माधवननं याविषयी खुलासा केला आहे. पहिल्यांदा तर अभिनेता सिनेमाचा रीमेक बनणार नाही असं ठामपणे म्हणाला. पण शेवटी त्यानं सिनेमात कोणते कलाकार असायला हवेत रिमेक बनल्यावर यावर स्पष्टच भाष्य केलं. आर माधवन म्हणाला,''आलिया भट्ट आणि कार्तिक आर्यन या सिनेमात असतील तर मला अधिक आवडेल''. 'रहना है तेरे दिल में' या सिनेमात दिया मिर्झा आणि सैफ अली खानही माधवन सोबत मुख्य भूमिकेत होते. २००१ मध्ये हा सिनेमा रिलीज झाला होता,आणि तेव्हा तरुणांमध्ये हा सिनेमा अधिक पसंत केला गेला होता. सिनेमाची लव्हस्टोरी आणि गाणी यांनी त्यावेळी सर्वांनाच आपल्या प्रेमात पाडलं होतं. आजही हा सिनेमा अन् सिनेमातील गाणी पसंत केली जातात. या मुलाखतीत आपल्याला जेनिफर अनस्टन सोबत काम कराचं स्वप्न असल्याचं अभिनेत्याने बोलून दाखवलं.

'रॉकेट्री- द नांबी इफेक्ट' सिनेमात आर माधवन मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा एरोनेटिकल इंजीनिअर नांबी नारायण यांच्या आयुष्यावर आधारित आहे. कान्स २०२२ मध्ये सिनेमाची खूप चर्चा झाली अन् त्याला नावाजलं देखील गेलं. या सिनेमाला कान्समध्ये स्टॅंडिंग ओव्हेशन(सर्वांनी उभ्या राहून टाळ्या वाजवल्या) मिळालं म्हणून प्रत्येक भारतीयाची मानही उंचावली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: दुसऱ्याच षटकात गुजरातला मोठा धक्का; सिराजने बेंगळुरूला मिळवून दिली पहिली विकेट

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT