Rakhi Sawant
Rakhi Sawant Instagram
मनोरंजन

Rakhi Sawant: करिअरचं सगळ्यात महागडं गाणं शूट करणार राखी सावंत..कोर्ट-कचेरी सोडून बया कामाला लागली..

प्रणाली मोरे

Rakhi Sawant: Song: टी.व्ही इंडस्ट्रीची ड्रामा क्वीन राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे भलतीच चर्चेत असलेली पहायला मिळते. सुरुवातीला तिचा पती आदिल खान दुर्रानीनं तिच्यासोबत लग्न झाल्याचा स्विकार करण्यास नकार दिला होता पण राखीपुढे त्याचं एक चाललं नाही आणि मग कुठे जाऊन त्यानं लग्नाचा स्विकार केला.

पण प्रकरण इथेच थांबलं नाही. यानंतर राखीनं आदिलवर पैसे लुटण्याचा आरोप केला. तसंच त्यानं तिला खूप मारलं असा देखील गंभीर आरोप तिनं त्याच्यावर लावला. या सगळ्या आरोपा दरम्यान राखीचा एक व्हिडीओ समोर आला आहे,ज्यात ती खूश दिसत आहे. व्हिडीओमध्ये ती बोलताना दिसत आहे की एवढ्या दिवसांपासून तुम्ही सगळ्यांनी मला रडताना पाहिलं आहे.

चला जाणून घेऊया राखीच्या खूश होण्याचं नेमकं कारण काय आहे?(Rakhi Sawant back to work song shoot video post)

राखीचा हा व्हिडीओ वीरल भयानीनं आपल्या इन्स्टाग्राम हॅंडलवर शेअर केला आहे. ज्यात राखी सफेद रंगाच्या कपड्यात खूप सकारात्म दृष्टीकोन घेऊन बोलताना दिसत आहे..खूश दिसतेय. व्हिडीओत पापाराझीसोबत बातचीत करताना राखी म्हणताना दिसत आहे..''फायनली मी आता शूटिंग करत आहे. रडतानाच पाहिलंय तुम्ही सगळ्यांनी मला. लोकांनी जेव्हा तिची प्रशंसा करणाऱ्या कमेंट्स दिल्या तेव्हा ती लोकांना विचारताना दिसत आहे की लसुनची कळी दिसतेय की अनारकली दिसतेय?''

यावर लोक देखील म्हणताना दिसत आहेत की, 'फुलझडी..फूल की कली दिसत आहे'. माहितीसाठी सांगतो की राखीचा हा अवतार तुम्ही खूप दिवसांनी पाहत आहात.

पुढे ती आपल्या आनंदाचं कारण सांगत म्हणाली की,'' खूप सुंदर गाणं मला मिळालं आहे..अभय अल्तमसनं इतकं छान ते गायलं आहे. आणि सलमान खानचा खास कोरिओग्राफर मुद्दसर भाईनं ते शूट केलं आहे. माझ्या कारकिर्दीतलं हे सर्वात महाग गाणं आहे. हे एक गाणं बनवायला ७० ते ८० लाख खर्च केले गेलेयत''.

एवढंच नाही तर राखी बोलता बोलता आपल्या व्हॅनिटी व्हॅनच्या स्टेप्सवर बसली आणि म्हणाली,''कोर्ट कचेरी खूप झाली..निगेटिव्ह गोष्टी माझ्या आयुष्यातून निघून गेल्या आहेत. मला काम करायचं आहे. आधीही मी काम करायची''.

''आज सकाळी सकाळी मी इन्स्टावर लाइव्ह गेली आणि रडू लागले. मी लोकांना हसवते,त्यामुळे माझ्या आयुष्यात अडचणी आल्या की लोक माझ्यावर विश्वास ठेवत नाही. अर्थात सगळेच एकसारखे नाहीत. काही लोक मला जज करू लागतात. शो मस्ट गो ऑन..आणि यानंतर राखी गाणं गाऊ लागले. जीना यहां मरना यहां इसके सिवा जाना कहां... ''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan Firing: त्याने स्वतःला संपवलं नाही..अनुज थापरची हत्या? कुटुंबीयांच्या दाव्याने एकच खळबळ

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Heeramandi: हिरामंडी पाहिल्यानंतर 'या' कारणामुळे भडकला अभिनेता; म्हणाला, "इतका अन्याय का? निराशाजनक! "

Latest Marathi News Live Update : कल्याणमधून श्रीकांत शिंदे अर्ज भरणार, जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT