Ranveer Singh with Union Minister Anurag Thakur at Dubai Expio Google
मनोरंजन

The Kashmir Files बाबतीत रणवीर सिंग चुकलाच;'दुबई एक्स्पो'त काय घडलं?

दुबई एक्स्पोच्या निमित्तानं भारतीय मंनोरंजन विषयावर अधारित चर्चाक्षेत्रात रणवीर सिंगनं सहभाग घेतला होता.

प्रणाली मोरे

बॉलीवूड(Bollywood) सुपरस्टार रणवीर सिंग(Ranveer SIngh) यानं दुबईत चक्क युनियन मिनिस्टर अनुराग ठाकुर यांना आपल्या बाजीराव-मस्तानी सिनेमातील मल्हारी गाण्यावर नाचवलं अशी बातमी सध्या गाजत असली तरी दुबईतनं आणखी एक मोठी बातमी भारतात धडकली ज्यावरनं आता नाराजगी पसलीय. दुबई एक्स्पोच्या मंचावर रणवीर सिंगनं म्हणे भारतीय सिनेमा यावर बोलताना RRR नं बॉक्सऑफिस रकॉर्ड तोडले याचं तोंडभरुन कौतूक केलं पण The Kashmir Files सिनेमा लो बजेट असूनही २०० करोड कमवतो याचा साधा उल्लेखही केला नाही. दुबईत दरवर्षी भरणाऱ्या प्रसिद्ध दुबई एक्स्पो एक्झिबिशनला त्यानं विशेष उपस्थिती दर्शवली होती. या एक्झीबिशनमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यावसायिक एकत्र येऊन माहितीचं अदान-प्रदान करतात. केवळ माहिती नाही तर या एक्झिबीशनचा शाही थाट सोबत ग्लॅमरस अंदाजही उपस्थित राहणाऱ्यांसाठी विशेष आकर्षण ठरतं. भारतीय प्रसारमाध्यमं आणि मनोरंजन क्षेत्र याविषयी आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात केंद्रिय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुरान ठाकूर(I&B Minister Anurag Thakur) आणि अभिनेता रणवीर सिंग यांनी संवाद साधला.

रणवीर कोणत्याही कार्यक्रमात नेहमीच त्याच्या अतरंगी पेहरावामुळे चर्चेत येतो. पण दुबई एक्स्पो कार्यक्रमात रणवीरनं लाल रंगाच्या शेरवानीत आपला आणखी एक वेगळा अंदाज दाखवून दिला. या कार्यक्रमात रणवीर भलताच खूश दिसत होता. त्यानं फोटोग्राफर्सलाही अगदी मनसोक्त फोटो काढून दिले. इतकंच नाही तर आपल्या जमलेल्या चाहत्यांनाही त्यानं हात उंचावत अभिवादन केलं. केंद्रिय मंत्री अनुराग ठाकूर यांनी भारतीय प्रसारमाध्यमं आणि मनोरंजन क्षेत्र याविषयीच्या चर्चासत्रात सांगितलं की,''वेगवेगळ्या विषयांचं निर्मितीक्षेत्र म्हणून भारताला मुख्य केंद्र बनवणं आणि त्यातनं लाखों नोकऱ्या उपलब्ध करुन देणं आणि जागतिक दर्जाचा विचारही केला जाईल हा मुख्य हेतू आहे. भारत हा मूळतः कथांनी भारलेला देश आहे. इथं अनेक कथा जन्माला आल्या आहेत. त्यांचा इतिहास भारताला लाभलाय. त्यामुळे नक्कीच भारत कथांचं केंद्र बनू शकेल. आणि यावर योग्य काम केलं तर पुढील काही वर्षात हे आपण शक्य करून दाखवू''.

रणवीरनं खासकरुन आपल्या संवादात एस.एस.राजामौली यांच्या 'RRR' सिनेमाचा उल्लेख केला. बॉलीवूडच्या सिनेमांना टक्कर देऊन RRR ने मारलेली झेप उल्लेखनीय आहे असं त्यानं बोलून दाखविलं. या सिनेमातील 'नाटू-नाटू' गाणंही त्यानं गाऊन दाखविलं. पण यावेळेस त्याने कमी बजेट मध्ये बनलेला असूनही २०० करोड कमावलेल्या 'द काश्मिर फाईल्स' सिनेमाचा साधा उल्लेखही केलेला नाही. पण त्यामुळे आता सोशल मीडियावर रणवीर विरोधात नेटकऱ्यांनी सूर काढण्यास सुरुवात केलेली दिसून आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्यात घसरण सुरुच,चांदीही झाली स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Teacher Recruitment : 'राज्यात सरकारी-अनुदानित शाळांमध्ये तब्बल 18,500 नवीन शिक्षकांची भरती करणार'; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

Latest Maharashtra News Updates : मोटारसायकल चोराला अटक, तीन बाईक्स जप्त

Explained: धावताना छातीत का दुखते? डॉक्टरांनी सांगितले 'हे' 5 कारण

उपमुख्यमंत्री शिंदेंनी कोणत्या अधिकाराखाली स्थगिती दिली? हायकोर्टाची विचारणा, बेकायदा इमारत प्रकरणी अडचणी वाढणार

SCROLL FOR NEXT