Rashmika Mandanna Troll Instagram
मनोरंजन

Rashmika Mandanna Troll: रश्मिकाला चिकन बर्गर खाणं पडलं महाग! लोक म्हणतायत..

काही दिवसांपूर्वी रश्मिकानं चिकन बर्गरच्या जाहिरातीचा एक व्हिडीओ शेअर केला होता,ज्यावरनं तिला आता लोकांनी धारेवर धरत एक सवालही केला आहे.

प्रणाली मोरे

Rashmika Mandanna आजच्या तारखेला टॉलीवूड आणि बॉलीवूड दोन्हीकडे प्रसिद्ध असलेली अभिनेत्री आहे. अल्लू अर्जूनसोबतच्या तिच्या 'पुष्पा' सिनेमानंतर सगळीकडेच तिचं वारं पसरलं आहे. लोक तिच्या सौंदर्याचे दिवाने आहेत. आणि तिला 'नॅशनल क्रश' देखील म्हटलं जातं. ती लाखो चाहत्यांच्या काळजात घर करून आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. पण सध्या मात्र ती चिकन बर्गर खाल्ल्यामुळे ट्रोल होताना दिसत आहे.(Rashmika Mandanna Troll due to chicken burger advertisement)

काही दिवस आधी रश्मिका एका बर्गर ब्रॅंडच्या जाहिरातीत दिसली होती. ज्यामध्ये तिला चिकन बर्गर खाताना दाखवलं गेलं आहे. काही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की आधी रश्मिका म्हणाली होती की ती शाकाहारी आहे,आणि आता चिकन बर्गर खात आहे. बरं इतकंच नाही तर त्याला प्रमोट करत आहे.

रश्मिका मंदानानं आपला हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता, ज्यावर एका नेटकऱ्यानं कमेंट केली की,'डबल ढोलकी...आधी म्हणाली शाकाहारी आहे मी आणि आता चिकन बर्गर खातेय..त्याचं प्रमोशही करतेय'.

Rashmika Mandanna Troll

आणखी एका नेटकऱ्यानं म्हटलं आहे की,तिला पैसा मिळाला नव्हता तोपर्यंत शाकाहरी होती,आता लगेच मांसाहारी झाली. रश्मिकाच्या चिकन बर्गर खाण्यावरनं लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

आजच्या काळात रश्मिका मंदाना चर्चेत आहे. तिच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचं झालं तर जानेवारीत विजयसोबत 'वारिसु' सिनेमात दिसणार आहे. याव्यतिरिक्त सिद्धार्थ मल्होत्रा सोबत ती 'मिशन मजनू' मध्ये दिसली होती. रणबीर कपूरसोबत 'अॅनिमल' सिनेमातही ती दिसणार आहे. हा एक बिग बजेट सिनेमा आहे. याव्यतिरिक्त रश्मिका अल्लू अर्जूनच्या 'पुष्पा २' मध्ये देखील दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रासाठी पुढचे ७२ तास महत्वाचे, कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार; मुंबईसह अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट

MP Cabinet:अग्निवीरांना मोठी भेट! पोलीस भरतीत 20% आरक्षण, भोपाळ गॅस ट्रॅजडीच्या जागेवर उभे राहणार भव्य स्मारक

Ayodhya Food: अयोध्या स्टाईल ब्रेकफास्ट करायचाय? राम मंदिर दर्शनानंतर या ठिकाणी फूड लव्हर्स नक्की जातात; कारण आहे 'महावीर टिक्की'

Pune Case : लोहगड खूनप्रकरणातील व्यावसायिक केतन अग्रवाल यांचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे उपचारादरम्यान निधन

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT