Kiran Mane
Kiran Mane टीम ई सकाळ
मनोरंजन

महाराष्ट्रात हे शोभणारे नाही; किरण मानेंच्या प्रकरणावर रोहित पवारांची प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

अभिनेते किेरण माने त्यांच्या परखड भुमिकेमुळे सतत चर्चेत असतात. सध्या त्यांना मालिकेतून बाहेर काढण्यात आल्याने ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. स्टार प्रवाहावरील 'मुलगी झाली हो' या मालिकेत ते काम करत होते. विलास पाटील ही त्यांची भुमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती मात्र त्यांना मालिकेतून असे अचानक काढल्याने यावर अनेकांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

अभिनेते किेरण माने यांनी आपण घेत असलेल्या राजकीय भुमिकांमुळेच मालिकेतून बाहेर काढल्याचा आरोप केलाय. आता यावर राजकीय मंडळीनी प्रतिक्रिया देत किरण माने यांना पाठिंबा दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी किरण माने यांना मालिकेतून काढल्याचा ट्वीटद्वारे निषेध व्यक्त केलाय.रोहित पवार म्हणाले "अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दडपशाही वृत्तींना मोठा अडसर असल्याने ही वृत्ती नेहमीच अभिव्यक्ती स्वातंत्र्य ठेचण्याचा प्रयत्न करते. राजकीय भूमिका मांडली असता एखाद्या कलाकाराला मालिका सोडण्याची वेळ यावी; याला दडपशाही वृत्तींनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा केलेला निर्घृण खुनच म्हणावा लागेल."

सोबत काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी सुध्दा किरण माने यांची बाजू मांडत भाजपवर निशाणा साधलाय. सचिन सावंत ट्वीटद्वारे म्हणाले, "किरण माने या गुणी कलाकाराने सद्य राजकीय परिस्थितीबद्दल मत व्यक्त केले. ते भाजपाला सहन झाले नाही. त्यामुळे दबाव आणून या कलाकाराला मालिकेतून काढले गेले. हा भाजपाचा सांस्कृतिक दहशतवाद आहे. भाजपा विरोधात बोलण्याची हिंमत कशी होते हा दंभ त्यामागे आहे."

यावर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सुध्दा जर कोणाच्या भाकरीवर टाच आणणार असाल तर ते योग्य नाही असे सुचक ट्वीट केले. जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले, "या महाराष्ट्रात दादा कोंडके, पु.ल.देशपांडे,निलु फुले या कलाकारांनी कधी टिका केली तरी त्यांच्या विचारांचा आदर करीत त्यांचा सन्मानच केला. याद राखा, हा महाराष्ट्र वैचारीक वारसा जोपासत तुमच्या विरोधात लिहीले म्हणुन तुम्ही जर कोणाच्या भाकरीवर टाच आणणार असाल तर ते योग्य नाही"

किरण माने हे त्यांच्या राजकीय आणि सामाजिक भुमिकेमुळे नेहमी चर्चेत असतात. आता त्यांना असे अचानक मालिकेतून बाहेर काढल्याने प्रेक्षक वर्गातून नाराजी व्यक्त केली जातेय. सध्या आय स्टँड विथ किरण माने हा हॅशटॅग सोशल मीडियावर प्रचंड वायरल होतोय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: विराट आऊट, पण फाफ डू प्लेसिसचा चेन्नईला अर्धशतकी दणका

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT