riteish deshmukh, dhiraj deshmukh, ved, genelia deshmukh, happy birthday SAKAL
मनोरंजन

Riteish Deshmukh: पप्पांना अभिमान वाटेल असं... धीरजला शुभेच्छा देताना रितेशला विलासरावांची आठवण

रितेशने धीरजला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात

Devendra Jadhav

Riteish Deshmukh News: आज रितेश देशमुखचा धाकटा भाऊ धीरजचा वाढदिवस. धीरजच्या वाढदिवसानिमित्ताने रितेशने बालपणीचा फोटो शेयर केलाय. या फोटोमध्ये रितेश, धीरज आणि अमित दिसतोय.

रितेशचा हा फोटो अल्पावधीतच सोशल मिडीयावर व्हायरल झालाय. रितेश अनेकदा त्याच्या कुटूंबाविषयी खास फोटो आणि आठवणी सोशल मिडीयाच्या माध्यमातुन सांगत असतो.

हेही वाचा: सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

(riteish deshmukh share old photo and recalled old memories with brother dhiraj deshmukh)

लहानपणीचा फोटो शेयर करताना रितेश लिहीतो.. माझ्या प्रिय धीरज.. आम्ही नेहमी तुमच्या डावीकडे आणि उजवीकडे ... तुमचे कायमचे ढाल ... वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

तुझा यंदाचा वाढदिवस चांगला जावो. तुम्ही करत असलेले चांगले काम करत राहा आणि पप्पांना तुझा अभिमान वाटेल असं.. अशा शब्दांमध्ये रितेशने धीरजला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.

रितेश जरी राजकारणात सक्रीय नसला तरीही तो त्याचे भाऊ अमित आणि धीरज यांच्या प्रचारासाठी अनेकदा जाहीर सभेत भाषण करताना दिसला आहे.

दरम्यान रितेशने २०२२ ला डिसेंबरच्या शेवटी आलेल्या वेड सिनेमातुन मराठी प्रेक्षकांना त्याच्या अभिनयाचं वेड लावलं. रितेश - जिनीलिया या जोडीला मराठी चाहत्यांनी अमाप प्रेम दिलं.

सगळ्या महाराष्ट्राला 'वेड' (Ved) लावणारी जोडी म्हणजे रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख.

३१ डिसेंबर २०२२ ला आलेल्या वेड सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ७० कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवला. हे दोघे सध्या न्यू यॉर्कला गेले आहेत.

काहीच दिवसांपूर्वी दोघांनी न्यू यॉर्क मध्ये ओपन बसमध्ये प्रवास केला. London नहीं New York ही सही !!! खुली Bus पे… ये गाना तो बनता है! असं कॅप्शन रितेशने बसमधला व्हिडिओ शेयर केला होता.

वेड सिनेमा रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी सिनेमाला भरभरून प्रतिसाद दिला. लहानांपासुन मोठ्यांपर्यंत सर्वांना वेड आवडला. महाराष्ट्रातील ठिकठिकाणी वेडने हाउसफुल्लची पाटी झळकवली.

वेडला मिळणार प्रतिसाद बघून रितेशने वेड तुझा या गाण्याचं नवीन व्हर्जन आणि काही प्रसंग समाविष्ट करून वेडची नवीन कॉपी थिएटरमध्ये रिलीज करण्यात आली.

त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांनी वेड पाहायला गर्दी केली. आता वेड च्या OTT रिलीजची प्रेक्षक वाट पाहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT