Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Starcast fees Instagram
मनोरंजन

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan: रामचरणनं भाईजानकडून घेतली भरघोस रक्कम, एक झलक दाखवायला आकारले चक्क इतके करोड..

सलमानच्या 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे, यानंतर आता सिनेमातील कलाकारांच्या मानधनाची जोरदार चर्चा रंगली आहे.

प्रणाली मोरे

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan: सलमान खानचा आगामी सिनेमा 'किसी का भाई,किसी की जान' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. सिनेमात व्यंकटेश दग्गुबाती,पुजा हेगडे,जगपति बाबू,भूमिका चावला,विजेंदर सिंग असे बडे स्टार्स आहेत. ट्रेलर रिलीजनंतर आता कलाकारांच्या मानधनाची चर्चा रंगलीय,तेव्हा चला जाणून घेऊया सिनेमातील स्टार्सच्या मानधनाविषयी.

सलमान खानचा 'किसी का भाई किसी की जान' सिनेमा २१ एप्रिल २०२३ रोजी ईदला रिलीज होत आहे. सिनेमात तो एका वेगळ्याच लूकमध्ये दिसत आहे. लांबसडक केसात भाईजान खूपच हॅंडसम दिसत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार अभिनेत्यानं या सिनेमासाठी ५० करोड रुपये घेतल्याचं बोललं जात आहे. (Salman Khan Kisi ka bhai kisi ki jaan starcast fees )

साऊथ सुपरस्टार व्यंकटेश दग्गुबाती देखील सलमानसोबत या सिनेमात दिसणार आहे. दोघांना एकत्रित पडद्यावर पहायला चाहते उत्सुक आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार कळत आहे की, व्यंकटेश सलमानच्या भावाच्या भूमिकेत दिसणार आहेत. व्यंकटेशन 'किसी का भाई किसी की जान' सिनेमासाठी ८ करोड चार्ज केले होते.

'किसी का भाई किसी की जान' सिनेमात सलमान खानसोबत पूजा हेगडे लीड अभिनेत्री आहे. रिपोर्ट्सनुसार कळत आहे की,तिनं ५ करोड घेतले आहेत.

तर साऊथ सुपरस्टार रामचरण हा कॅमियो साकारताना दिसणार असला तरी त्यानं त्या एका झलकसाठी तब्बल ३ करोड घेतले आहेत. तर शहनाज गिलला ५५ लाख आणि जस्सी गिलला ७० लाख रुपये मानधन देण्यात आलं आहे.

सलमान खान प्रॉडक्शनच्या 'किसी का भाई किसी की जान' सिनेमाचं दिग्दर्शन फरहाद सामजीनं केलं आहे. सिनेमात सलमान खान,व्यंकटेश दग्गुबाती,पूजा हेगडे,जगपति बाबू,भूमिका चावला,विजेंदर सिंग,अभिमन्यु सिंग,राघव जुयाल,सिद्धार्थ निगम,जस्सी गिल,शहनाज गिल,पलक तिवारी आणि विनाली भटनागर आहेत.

हा सिनेमा २१ एप्रिल २०२३ रोजी ईदला रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

Viral: पैसे उधार घेणाऱ्यांनो लक्ष द्या...! उसने घेतलेली रक्कम वेळेत परत केली नाही तर होणार जेल अन्..., न्यायालयाचा निर्णय

SCROLL FOR NEXT